August 2, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

गावोगावी पोहोचणार १०० बुद्ध मूर्ती

तपोवनातून शोभायात्रा : ५०० श्रामणेरांचा सहभाग; महाबौद्ध धम्म परिषद

  • गावांना देण्यात आलेल्या १०० मूर्ती या प्रत्येकी साडेपाच फूट उंच असून, फायबर मेटलपासून एकाच साच्यात तयार करण्यात आल्या आहेत.
  • रंगीबेरंगी फुलानी व निळ्या झेंड्यांनी सजवलेल्या १०० स्थामधून या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.
  • । भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, भदन्त बोधीपाल, भदन्त धम्मरल, भवन्त सुगत, भदन्त आर्यनाग, भदन्त शीलरन आदींनी मार्गदर्शन केले.

सिडको यानिमित्ताने नाशिक शहरातून सायंकाळी मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील १०० गावांमधील ५०० श्रामनेर आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते. गोल्फ क्लब येथे महाबौद्ध धम्म परिषद, प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

सम्राट अशोक जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि भगवान बुद्ध जयंती तथा बुद्ध पौर्णिमा यानिमित्त दि. २३ एप्रिल ते २ मेदरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये श्रामनेर शिबिर घेण्यात आले. या शिविरात १०० गावांतील प्रत्येकी ५ उपासक श्रामणेर झाले असून, सुमारे ५०० श्रामणेरांचे प्रथमच अशा प्रकारे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. सायंकाळी ५ वाजता तपोवनातून शोभायात्रेस प्रारंभ झाला. त्यानंतर ही मिरवणूक जुना आडगाव नाका, द्वारका, मुंबई नाका, गडकरी चौक, त्र्यंबक नाका, सीबीएसमार्गे गोल्फ क्लब येथे आली. या शोभायात्रेत भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, भदन्त बोधीपाल भदन्त धम्मरत्न, भदन्त सुगत, भदन आर्यनाग, भदन्त शीलरत्न आदींसह पंचशील ध्वजाचे प्रतीक असलेल्य छत्री हाती घेऊन शेकडो श्रामणे आणि पांढरे वस्त्र परिधान केलेल् हजारो स्त्री पुरुष, समाजबांधव सहभागी झाले होते. गोल्फ क्लब येथे मिरवणुकीचे रूपांतर श्रामणेर शिविर तथा प्रबोधन सभेत झाले. यावेळी महा बौद्ध धम परिषद आयोजित करण्यात आली होती