विश्वाला शांती व अहिंसेचा शिकवण देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांना ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, त्याच बोधी वृक्षाची श्रीलंकेतील अनुराधापूर येथील फांदीचा नाशकातील बुद्ध स्मारकात २३ व २४ मे रोजी प्रतिष्ठापणा सोहळा होणार आहे. या ऐतहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व पालकमंत्री दादा भुसे, श्रीलंकेचे बुद्धशासन व संस्कृती मंत्री विदुर विक्रमनायेके यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी दिली. जवळपास तेवीसशे वर्षांपूर्वी सम्राट अशोकांचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांच्या माध्यमातून बिहारमधील बोधगया येथून श्रीलंकेला अनुराधापूर या ठिकाणी बोधी वृक्षाची रोपण करण्यात आले होते. याच वृक्षाची फांदी नाशिकला मिळविण्यासाठी नाशिकमधील शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला. श्रीलंकेच्या सरकारच्या आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या वृक्षाची फांदी देण्यासाठी तेथील सरकारने तयारी दाखवली. त्यानुसार २२ मे रोजी विमानातून मुंबईला बोधी वृक्षाची फांदी आणली जाणार आहे. शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टने आमदार अॅड. ढिकले यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. जिल्हाधिकारी गंगाधरण डी. यांनी आमदार अॅड. ढिकले, ट्रस्टचे पदाधिकारी तसेच महापालिका व पोलिस आयुक्तालयाशी संपर्क साधून प्रत्यक्ष बुद्ध स्मारकातील नियोजित जागेची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, मुख्य संयोजक भिक्खु सुगत थेरो, मुख्य निमंत्रक भिक्खु संघरत्न, भंते धम्मरक्षित महापालिकेचे मिळकत व्यवस्थापक राऊत, बुद्ध स्मारकाचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाने, निवृत्त सहकार विभागीय निबंधक गौतम भालेराव, देवेंद्र काळे, दिलीप साळवे, शरद काळे आदी उपस्थित होते.
श्रीलंकेतील बोधीवृक्षाचे नाशिकमध्ये प्रतिष्ठापणा सोहळा होणार.

More Stories
“बाह्य हस्तक्षेपाशिवाय तिबेटी बौद्ध समुदायाला पुढील दलाई लामा निवडण्याचा अधिकार असावा” असे स्कॉटिश सरकारचे म्हणणे आहे.
सारनाथ येथील बुद्धांचे पवित्र अवशेष व्हिएतनामला प्रदर्शित
चीनने दलाई लामा यांच्या मृत्यूनंतर भिक्षूंना करू शकत नसलेल्या गोष्टींची यादी दिली आहे