June 18, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

पोलीस भरती तारखा जाहीर! ३ नोव्हेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार ! | Police Bharti 2022

पोलीस शिपाई भरती 2021 महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, 2021 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक २३.६.२०२२ च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारीत तरतुदींनुसार पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक (संबंधीत पोलीस घटक कार्यालयाचे नांव नमूद करावे) यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई (संबंधीत घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेकडून भरण्यात येत असलेल्या पदाचा उल्लेख करावा) यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक ०३.११.२०२२ ते ३०.११.२०२२ या कालावधीत स्विकारण्यात येतील. ह्या बाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवारास पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता

येईल. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर

उपलब्ध राहणार आहे.

उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.

पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी

परीक्षा हो पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा. भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात

येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण

असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. निवडसूचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये, शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय दि. १०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यांत येईल.

पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुशा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ बाबत होणान्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधिन राहून व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक १७५/२०१८ व इतर संलग्न याचिकांमध्ये दिनांक २७.०६.२०१९ रोजी दिलेल्या निर्णयाविरुध्द मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेबाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून रिक्त पदांची गणना केलेली आहे. त्यामुळे जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे.

शासनाने लागू केलेले खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू केलेले आरक्षण हे या अनुषंगाने उद्भवणान्या न्यायालयीन

प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधिन असेल,

पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व

समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी, तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत. उमेदवारांनी संकेतस्थळावर जावून आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे. त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने र्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात ( Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत.

http://policerecruitment2022.mahait.org/

 

महत्त्वाची टीप: जिल्हा पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरुपाची मागणी केल्यास संबंधीत उमेदवाराने त्याबाबतची माहिती अॅन्टीकरप्शन ब्युरो, यांना दुरध्वनी क्रमांक वर त्वरीत संपर्क साधून तक्रार करावी. तसेच, या संदर्भात उमेदवार पोलीस आयुक्त / अधीक्षक या कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांशी किंवा अध्यक्ष, पोलीस भरती समिती- २०२१ तथा अपर पोलीस आयुक्त/ अपर पोलीस अधीक्षक / पोलीस उपअधीक्षक, यांच्याशी संपर्क साधून तक्रार करू शकतील. तसेच, पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयात ०२२-२२८५५६१४ या दूरध्वनी क्रमांकावरही तक्रार करता येईल.