November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

माघ पौर्णिमा Magha Purnima

माघ पौर्णिमलाही बुध्द पौर्णिमे इतके महत्व प्राप्त झाले आहे.

या पौर्णिमेस त्रिसरण अष्टशीलाचे पालन करून त्या दिवशी सर्व लहानथोर मंडळींनी एकत्र जमून वंदना करावी, धम्म देशना ऐकावे.

सम्राट धम्मराजा विश्ववंदनीय शाक्यसिंह भगवताने वैशाली महानगरीमध्ये इ.स. पूर्व ४८३ ला ४५ वा वर्षावास केला. दिवसा सरानंदचेत्यामध्ये महाप्रशावान शांतीदूत भगवान बुद्ध चापाल चैल्यामधे विश्रांती घेत असत. वर्षावास पूर्ण करून चापाल चैत्यामध्ये पूर्ण हिवाळा व्यतित करीत होते त्यावेळी मारतेथे आला आणि भगवान बुध्दा म्हणाला आता आपण आयुसंस्कार करावा. आपण म्हटल्याप्रमाणे आपले शिष्य उपासक उपासिका हो अर्हत निर्वाण प्राप्त झाले आहेत. तेव्हा आपण आयु संस्कार करावा. तेव्हा सर्व भिक्ख संघाला पाचरण करुण भगवंताने विचारले कि भिकानु सपास माझ्यापासून काय हवे आहे. तेव्हा संघ मौन झाला. असे तीन वेळा विचारले असता मीनच होता. तेव्हा आनंद म्हणाला आश्चर्य आहे भगवान आश्चर्य आहे तथागत आनंद मी आता बाहेर असे काही लपवा लपवी केली नाही. उपड सर्व सांगितले आहे. तेव्हा माघ पौर्णिमेच्या दिवशी शाक्यसिंह शिरोमणी महाकारुणीक लोक नायक भ. बुद्धानी आनंदाला बोलावून सारनन्द चैत्य येथे जाऊ या म्हटले, आनंद! भगवान बुद्ध वकरच महापरिनिर्वाण होतील असे म्हटल्यावर आनंद म्हणाला, भगवंत संघासाठी काही उपदेश द्या.

आनंदा आत्यद्विप, आत्यसरण, धम्मद्विप, धम्मसरण, संघ दीप, संघ सरण ग्रहण करून विहार करा. वैशालीवरून जातेवेळी म. बुद्ध गजराजाप्रमाणे मागे वळून बघतात व आनंदाला म्हणतात, रमणिय आहे वैशाली! रमणीय आहे उद्यान वैित्य!! रमणिय आहे गीतम चैत्य नि रमणिय आहे स्तंभक चैत्य!!! हे आनंद रमणिय आहे बहपुत्रक चैत्य नि रमणिय आहे सारानंद चैत्य रमणिय आहे चापाल चैत्य!! रमणि आहे महावन कुटीवर शाळा आनंद) तथागत आजपासून तीन महिन्यांनी महापरिनिर्वाण होतील. भगवंतानी माघ पौर्णिमेला आपला आयुसंस्कार केला आहे. माघ पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमा एवढेच महत्व प्राप्त झाले आहे. या दिवशी बौद्ध राष्ट्रात आणि भारतात बौद्ध धम्माचे लोक माघ पौरिमिचा महान सोहळा साजरा करतात. या दिवशी बुद्धमूर्तीची विशाल मिरवणुक काढतात. धम्मदेशना ऐकतात. अष्टशीलाचे व्रत करतात.