त्रिरश्मी बुद्ध लेणी आणि स्तुप , धम्मप्रसारक बहुऊदेशिय संस्था जि.नाशिक ( महाराष्ट्र) या सामाजिक संस्थेच्या वतीने
दिनाक १५ आक्टोबर २०२१ रोजी त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील स्मारक या ठिकाणी ६५ व्या बौद्ध धम्म दिक्षा दिनाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी सकाळी संस्थेच्या वतीने सकाळी धम्म ध्यजारोहण १० वाजता स्थाईक नगरसेविका दिक्षाताई लोढे व नगरसेवक भगवान दोदे तसेच कृती समितीचे वामणदादा गायकवाड ,वामण पवार, बाळासाहेब शिदे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भंन्ते सुगत व यू नागधमो , धम्म रखित भंन्ते यांनी ध्वजगाथा घेतली आली ।
सकाळी त्रिरश्मी बुद्ध लेणी स्तुप याठिकाणी समितीच्या वतीने स्मारकामधे बौद्ध बाधंवाच्या उपस्थित बाळासाहेब शिदे जितेश शार्दुल ,अरुण शेजवळ ,याचा हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापुजन व बुद्ध रुपाचे पुजन करण्यात आले यावेळी वामण पवार विपश्यना साधक यानी त्रिशरण पंचशील गाथा घेण्यात आली व भिमस्तुती व सणेतय घेण्यात आले. यानंतर प्रदिप लबडे व मित्रमंडळ यानी उपासक साठी अन्न दान चा कार्यक्रम केला . या ठिकाणी समितीच्या वतीने शुभेच्छा पत्रक व विविध सुविधांचा उभाव वर प्रकाशजोत टाकणारे पत्रकाचे वाटप शीलाताई पाटील , कल्पना तपासे ,राजश्री शेजवळ , वामन पवार ,मंदाकिनी दाणी ,शैलाताई उघाडे अरुण शेजवळ यांनी केले , या ठिकाणी धम्म उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु या ठिकाणी पुस्तके व खादया पदार्थ चे महत्त्वाचे पाणी या ठिकाणी दुकाने लावण्यासाठी प्रशासनाने परावनगी न दिल्यामुळे गैरसोय निर्माण झाली .आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी अरुण शेजवळ जितेश शार्दुल, बाळासाहेब शिदे ,वामण पवार,युवराज शिदे , यांनी बौद्ध बाधंवाना धम्म दिक्षा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केली.
More Stories
महाड विपश्यना केंद्रात 10 दिवसीय अभ्यासक्रमात काही जागा उपलब्ध
धम्मध्वज आणि जनसंवाद यात्रेचे वेळापत्रक Schedule of Dhamma Flag and Jansamvad Yatra
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा