July 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

कुठे चालली ही माणसं

कुठे चालली ही माणसं
असा पडला आज प्रश्न
विसर पडतो आहे
माणुसकी जपण्याचा
दाखवला ज्यांनी मार्ग मानवतेचा
मागे सारत चालले अशा तथागतांना
कुठे चालली ही माणसं
पडला आज असा प्रश्न

रोवली ज्यांनी विज्ञानाची बिजे
माणसांनी ठेवा विचार मैत्रीचे
असा अमुल्य मंत्र दिला जगास
निर्मळ चित्त आणि कर्म शुद्ध
हा विचार सोडुन ही माणसे चालली कुठे

चित्ताची मलिनता दुर करते सद्धम्म
त्रिशरण, पंचशिल आणि अष्टांगीक मार्ग
अनुसरुन बुद्धांची शिकवण
त्यातुन येई जीवनाला वळण
हा विचार सोडुन कुठे चालली ही माणसं

निसर्ग निर्मित सृष्टीवर
झाली निर्मिती मानव संज्ञेची
स्वबुद्धीच्या बळावर
माणुस करतो आकाश पाताळ भ्रमण
विसरुन तर्कशुद्ध बुद्धीमत्ता
चालली कुठे ही माणसं
असा पडला आज प्रश्न

अर्चना चव्हाण, नागपुर.
8624062012