दि 26 नोव्हेंबर 2024 ला धानोरी ता चिखली जिल्हा बुलडाणा येथे 75 वा संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम महामानवाच्य तथा संविधानचे पूजन कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक निरंजन जाधव सर बुलडाणा यांच्या मंगल हस्ते करण्यात आले.
त्यांनी संविधानाच्या महत्त्वावर मार्गदर्शन करत असताना सांगितले की, संविधान सभे मध्ये भारताच्या तत्कालीन 40 कोटी लोकसंख्याच्या प्रमाणात 10 लाख संख्येस एक,असे एकुण 389 सदस्य संख्या होती. ती पुढील प्रमाणे ब्रिटिश इंडियाचे 292, देशी रियासत मधून 93,आणि केंद्रशासित प्रवेशाचे 04 या प्रमाणे होते.प्रारुप समितीचे अध्यक्ष या नात्याने तब्येत ठीक नसताना सुद्धा 2 वर्ष 11 म.17 दिवसात पुर्ण केले. देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या संविधानास आज 75 वर्ष पुर्ण झाल्याच्या संविधान दिनाच्या उत्सवा प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास धानोरी येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
●धानोरी येथे 75 वा संविधान दिवस उत्साहात साजरा ●

More Stories
Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा संपन्न झाला
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.