12 डिसेंबर : महाराष्ट्र गृह निर्माण विभागाकडून (Mhada exam 2021 Postponed) गृह निर्माण विभागात भरतीसाठी 12 डिसेंबर रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
यात त्यांनी सांगितलं की म्हाडाची पूर्ण आठवड्यात होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे (Mhada Exam Updates). आज ही परीक्षा होणार नाही. काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा थेट जानेवारी 2022 मध्ये घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं (Mhada Exam New Date).
जितेंद्र आव्हाड यांनी यासाठी विद्यार्थ्यांची माफीही मागितली आहे. आज होणारी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जावू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासासाठी माफी मागत विद्यार्थ्यांनी सकाळी केंद्रावर जाण्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नये, यासाठी आपण एवढ्या रात्री हा व्हिडिओ शेअर करत असल्याचंही आव्हाडांनी व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे. दरम्यान म्हाडाची परीक्षा आता जानेवारी महिन्यात घेतली जाणार आहे

More Stories
🪷 २५०० वर्षांपूर्वीच्या बुद्ध लेणींच्या अज्ञात अभियंत्यांना समर्पित अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🪷
भूतान आणि सिंगापूरसारखे देश ‘बौद्ध मुत्सद्देगिरी’चा अवलंब करतात
भारत पुन्हा बुद्धांकडे वळत आहे का ? Is India turning towards the Buddha again?