February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

येवला येथील मुक्तीभुमीवर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरू

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक  येवला येथे सुरक्षारक्षक म्हणून भरती केलेला कर्मचारी तात्काळ हटवा व टप्पा क्रमांक 2 चे लोकार्पण करून अनुसूचित जातीमधील मुलांना कामगार भरती करा

महेंद्र पगारे यांनी महासंचालक बार्टी पुणे कामगार आयुक्त नाशिक प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण नाशिक तसेच मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना दि.16/1/2024रोजी निवेदन दिले होते व 23/1/2024रोजी पुन्हा स्मरण पत्र दिले होते त्यानंतर पुन्हा या सर्वाना दि.1/2/2024 पुन्हा लेखी निवेदन देऊन जर मागणी मान्य झाली नाही तर 6तारखेला आमरण उपोषणास बसणार म्हणून पत्र दिले होते त्यानुसार नाशिक सुरक्षारक्षक मडंळ नाशिक यांनी उडवाउडवीची उत्तर दिले व प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण नाशिक यांनी महासंचालक बार्टी पुणे यांनी उचित कारवाई करावी म्हणून पत्र दिले त्यामुळे आज मी आमरण उपोषणास बसलो आहोत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा निर्धार महेंद्र पगारे यांनी केलेला आहे

सविस्तर असे की भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 साली येवला मुक्कामी धर्मातराची ऐतिहासिक घोषणा केलेल्या येवला मुक्तीभूमी स्मारक येथील टप्पा एक च्या ठिकाणावरील रिक्त झालेली एक सुरक्षारक्षकाच्या जागी भरण्यात आलेले सुरक्षारक्षक हे वेगळ्या प्रवर्गातील असून जेव्हा मुक्तीभूमी स्मारकाचे लोकार्पण झाले होते तेव्हा तत्कालीन महासंचालक बार्टी व मा.समाज कल्याण आयुक्त साहेब तसेच मा.भुजबळ साहेब हे उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना होते की मुक्तीभूमी स्मारकाच्या ठिकाणी सर्व कर्मचारी हे देखभाल व स्वच्छतेसाठी अनुसूचित जातीचे कर्मचारी भरले जातील असेही ठरले होते व त्यानुसार भरण्यात आलेले होते .त्यानुसार आज पर्यंत कर्मचारी भरण्याच्या वेळी सर्व अनुसूचित जातीचे भरण्यात आलेले आहे परंतु  सन2023 साली रिक्त झालेल्या एका सुरक्षारक्षकाच्या जागेवरती वेगळ्या प्रवर्गातील कर्मचारी कशा पद्धतीने भरण्यात आला याची कल्पना मा.अध्यक्ष सचिव यांना असताना देखील यात मंडळातील काही अधिकाऱ्यांनी आर्थिक गैर व्यवहार करून या कर्मचाऱ्याला नियुक्ती देण्यात आली का? व त्यामध्ये बार्टीतील काही अधिकाऱ्यांचा काही हस्तक्षेप आहेत का? याची देखील आपण आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी.

असे निवेदन सादर केलेले आहे महेंद्र पगारे याच्या उपोषणास आज खुप मोठा प्रतिसाद मिळाला तसेच विविध संघटनेने पण पाठींबा दिला

यावेळी विजय घोडेराव विनोद त्रिभुवन सुभाष गांगुर्डे दत्तु वाघ गौतम पगारे अजीजभाई शेख दत्तु वैद्य भाऊसाहेब गरूड समाधान पगारे संतोष आहीरे नवनाथ पगारे अतुल धिवर नाना पिंपळे ऋषिकेश पगारे दादासाहेब मोरे बाळासाहेब सोनवणे पिटर काळे अँड.अनिल झाल्टे मोहन जावळे संजय भालेराव मानेकर बाबुजी किरण आहीरे हमजाभाई शेख मंगेश साबळे दुर्गेश गरूड सचिन भालेराव भोलाकाका पवार श्रावण देवरे सिध्दार्थ निकम सतोष लाठे सौ.आशा आहेर सौ.रेखा साबळे कु.रंजना पठारे सौ.ज्योती पगारे सौ.उषाताई पगारे सौ.नयना सोनवणे सौ.सुनंदा काळे सौ.मनिषा गरूड सौ.संधा गरूड याच्यासह अनेक स्त्री पुरूषांनी सहभाग नोंदवला.

येवल्यातील मुक्तीभूमी सुरक्षा रक्षकासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचारी नेमावा स्वा रि पा उपोषणाचा तिसऱ्या दिवशी विविध नेते मंडळींचा पाठिंबा आमरण उपोषणाचा 3रा दिवस,,,
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री, महेंद्र पगारे येवला यांचा अतिशय महत्त्वाच्या प्रश्नासाठी आमरण उपोषणाचा 3रा दिवस उजाडला तरी संबंधितांनी लक्ष देऊ नये ही दुर्दैवाची बाब आहे येवला मतदार संघातील मंत्री महाशयांनी दखल घेऊ नये हे खेदजनक आहे आज जर यावर तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन व्यापक स्वरूपात करण्यात येईल याची नोंद घ्यावी सर्व संबंधिताना पत्र व्यवहार झालेला आहे उपोषण ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ते,सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी भेट दिलेली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घ्यावी अन्यथा सदर चे आंदोलन चिघळण्याची शक्यतां नाकारता येत नाही,
—अजीज शेख,सामाजिक कार्यकर्ते,येवला.