संविधान जनजागर मंच आयोजित ४ थी राज्यस्तरीय संविधान जागर परिषद
रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी वेळ – सकाळी १०:३० ते सायं. ६:०० वा.
सकाळी १०:३० ते दु. २.०० पहिले सत्र
दुपारी २:०० ते दु. २:३० स्नेहभोजन
दुपारी २:३० ते सायं. ६:०० दुसरे सत्र
स्थळ :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का, पुणे रेल्वे स्टेशन जवळ पुणे.
विषय :- भारताचे संविधान समस्त भारतीयांच्या जीवन उत्कर्षाचा दिपस्तंभ.
कोणत्याही देशाचे संविधान अर्थात त्या देशाचा कायदा समस्त जनतेला माहित असणं हे अत्यंत | आवश्यक असते. ज्या देशातील संविधान जनतेला माहित असते, त्या देशातील जनता आपल्या हक्क | अधिकारांसंबंधात जागरुक असते. भारताच्या संविधानाबद्दल समस्त भारतीय जनतेला योग्य माहिती आहे असे आपण म्हणु शकत नाही. या सर्व भारतीय नागरिकांना देशाच्या संविधानाची किमान साधारण ओळख व्हावी. त्याचप्रमाणे आपल्या भारत देशाचे संविधान समस्त भारतीयांच्या जीवन उत्कर्षाचा दिपस्तंभ कसा आहे ? या विषयाचे विचार मंथन व्हावे, यासाठी २६ नोव्हेंबर या भारतीय संविधान दिनाच्यानिमित्ताने सदर संविधान जागर परिषदेचे समस्त भारतीयांसाठी आयोजन केलेले आहे. तरी आपण आवश्य उपस्थित रहावे ही नम्रतेची विनंती.
संयोजक – आम्ही भारताचे लोक
संविधान जनजागर मंच आयोजित ४ थी राज्यस्तरीय संविधान जागर परिषद मध्ये सहभागी होण्यासाठी आपण ही लिंक भरावी आणि इतरांना भरण्यासाठी पुढे फॉरवर्ड करावी ..!
https://forms.gle/NeUzNWU6CVG4R7bx9
More Stories
एक दिवसीय समाधी साधना शिबिर One-day Meditation Retreat in Mumbai
सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडून विजयस्तंभाच्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन तयारीची पाहणी
दिवाळी ही बौद्ध पद्धतीने साजरी करावी. Diwali should be celebrated in this Buddhist way.