August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

निळा झेंडा विकतांना पाहीला मी.. – विकास साळवे,पुणे

निवडणुकीत निळा झेंडा विकतांना पाहीला मी,
निवडणुकीच्या धामधुमीत झिंगतांना पाहीला मी..

आपसातल्या लढाईनं सत्तेचं तक्त मुकतांना पाहीलं मी
स्वाभिमानी म्हणविणारं बाळ तुझं झुकतांना पाहीलं मी..

प्रस्थापितांची ओझी वाहून वाकतांना पाहीले मी,
स्वार्थाने बरबटलेली लाचारीत माखतांना पाहीले मी..

अन्यायाच्या अग्नीत लाचारी होरपळलेली पाहीली मी,
निळ्या झेंड्यासवे स्वत:लाच विकलेली पाहीली मी..

भावनेत लोटली गर्दी चिरडतांना पाहीले मी,
पिढ्यांन् पिढ्या निष्पाप माणसे भरडतांना पाहीली मी..

विकास साळवे , पुणे
+919822559924..✍