Ellora-Ajanta International Festival 2023
२५,२६, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सोनेरी महाल येथे जागतिक दर्जाच्या सुप्रसिध्द कलाकार आपली कला सादर करणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने १९८५ पासुन वेरुळ येथील कैलास लेणी समोरील जागेमध्ये जगविख्यात वेरूळ महोत्सव आयोजित करण्याची सुरूवात केली होती. सदर महोत्सवाचे रूपांतर २००२ पासुन वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात करण्यात आले. सदर महोत्सव जिल्हा प्रशासन, संयोजन समीती व पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात येतो. प्रतिवर्षी प्रमाणे सन २०१६ साली वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु मागच्या काही काळात विविध कारणामुळे हा महोत्सव होऊ शकला नाही. मात्र यंदा २५ , २६ आणि २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सोनेरी महाल येथे तब्बल सात वर्षानंतर पुन्हा वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव होणार आहे. याबाबत औरंगाबाद जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
मान्यवरांच्या हस्ते रविवारी होणार उद्घाटन !
पूर्वरंग हा वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाची नांदी असलेला पूर्वरंग कार्यक्रमाने महोत्सवाला सुरुवात होईल. याचे उद्घाटन रविवारी बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. यावेळी रावसाहेब दानवे (केंद्रीय राज्यमंत्री- रेल्वे, कोळसा व खाण, भारत सरकार) आणि डॉ. भागवत कराड ( केंद्रीय राज्यमंत्री वित्त, भारत सरकार ) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, संदीपान भुमरे ( पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र ) यांचे अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. तर अब्दुल सत्तार ( कृषी मंत्री महाराष्ट्र ) , अतुल सावे ( सहकार व पणन, तथा सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र ) हे कार्यक्रमाचे सह अध्यक्ष असतील.
महोत्सवानिमित्त पूरक कार्यक्रमांची रेलचेल!
वेरूळ औरंगाबाद महोत्सवानिमित्त यंदा शहरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गायन वादन तसेच व्याख्यान- सादरीकरण यांचा समावेश करण्यात आला आहे. “पूर्वरंग” कार्यक्रमानंतर आठवड्यात हे कार्यक्रम होतील. यामध्ये १५ फेब्रुवारी रोजी क्रांती चौकात लोककलांचे सादरीकरण होईल. सुमित धुमाळ (गोंधळ), शेखर भाकरे (भारुड) आणि अजिंक्य लिंगायत (पोवाडा) हे कलाकार सहभागी होतील. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी पैठण गेट येथे राहुल खरे (भावगीत भक्तीगीत) तसेच पं विश्वनाथ दाशरथे (भक्तीगीत- उपशास्त्रीय) यांच्या गायनाचा आनंद रसिकांना घेता येईल. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी दिल्ली गेट येथे झामा कव्वाल ग्रुपचे सादरीकरण होणार आहे. हे सर्व कार्यक्रम रात्री ८ ते ०९:३० दरम्यान होतील.
More Stories
भारतीय बौद्ध महासभा – नासिक जिल्हा, तालुका पदाधिकारी नियुक्त समारंभ
राष्ट्रपतींच्या हस्ते उदगीर येथील ‘विश्वशांती बुद्ध विहार’चे लोकार्पण…
नऊ दिवसीय अट्ठसील अनागारिका सिक्खा शिबिर-२०२४, 9 Days Atthasīla Anāgārikā Sikkhā Shibir 2024