November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

थेरो उपाधी दीक्षा विधी तथा सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

जयभिम नगर बुद्धभूमी वेल्फेअर असोसिएशन द्वारा आयोजित
थेरो उपाधी दीक्षा विधी तथा सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
सर्व श्रद्धावान उपासक, उपासिका त्रिरत्नानुभावे जयमंगल, जयभीम !
आपणा सर्वांना कळविण्यात येते की, जयभीमनगर बुद्ध विहार, पवई येथे गुरुवर्य पूज्य भदन्त विशुद्धानंदबोधी महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या पवई, मुंबई शहरात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
धम्मामध्ये सांगितलेल्या १० महत्वाच्या धार्मिक कार्यक्रमासोबत भिक्षूचा उपसंपदा, बेरो व महाथेरो उपाधी दीक्षा हा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा विधी आहे. धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी जेंव्हा एखादा तरुण-तरुणी गृहत्याग करुन प्रवज्जित होतो. तेव्हा तो प्रथमच श्रमणेर होतो. श्रमणेर जीवन किमान ५ वर्षे जगतो. त्यानंतर त्याच्या मनाची तयारी करतो की, मला जीवनभर भिक्षु बनून रहावयाचे आहे. वरिष्ठ भिक्षुक्षंकडून उपसंपदा करतो. त्यानंतर पूर्ण जबाबदारीने धम्माचा प्रचार प्रसार करत सचोटीने जीवन जगत १० वर्षे पूर्ण करतो. तेव्हा परत बरिष्ठ भिंकडून विधी पूर्ण करतो तेव्हा त्याला बेरो पदवी प्राप्त होते. जो संपुर्ण आध्यात्मिक धार्मिक विधी आपल्या परिसरात प्रथमच संपन्न होणार आहे.
यामध्ये पूज्य भदन्त संघप्रिय, पूज्य भदन्त शिलबोधी, पुज्य भदन्त पद्मपाणी यांचा थेरो उपाधी दीक्षा विधी संपन्न होणार आहे
भदन्त संघप्रिय , भदन्त शिलबोधी, भदन्त पद्मपाणी
तसेच आपले धम्मबंधू भदन्त शिलबोधी यांचा जन्मदिवस आहे. जन्मदिवसाच्या निमित्ताने उपासकांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. रक्तदानाचे महत्व आपल्याला कोरोना काळापासून प्रकर्षाने जाणवले. रक्तदान हे एक प्रकारे जीवनदान आहे. जीवनदान सर्वात मोठे पुण्यकर्म आहे. आपण मोठ्या संख्येने या पुण्यकर्मात सहभागी व्हावे.
गेल्या वर्षी भदन्त शिलबोधीच्या जन्मदिवसानिमित्त श्रद्धावान उपासकांनी मोटर सायलक दान दिली होती. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रद्धावान दानशूर उपासक यांच्या दानातून धम्माचा प्रचार प्रसाराला गती मिळण्यासाठी चार चाकी गाडीचे दान करण्याचा सम्यक संकल्प केला आहे.
सर्व उपासक उपासिकांच्या वतीने पूज्य भदन्त शिलबोधी यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
भव्य रक्तदान • शिबीर
• खुन ना पुछे धर्म और जाती, वह तो पुजे इन्सान की जाती !
कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पुज्यनिय भिक्खूसंघ उपस्थित राहील. भिक्खूसध पूजा वंदना, परित्राण पाठ घेऊन उपासक उपासिकांना विशेष धम्मदेसना देतील. यानंतर भिक्खू संघाला आर्थिक दान करण्यात येईल. तसेच प्रबोधत्मक मनोरंजनासाठी विशेष बुद्ध भिम गीते गायनाचा (या निळ्या निशानासाठी) कार्यक्रम आयोजित केला आहे. अशा सुंदर धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घेऊन कार्यकमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
-: कार्यक्रमाची रूपरेषा :-
सकाळी ९.०० ते ४.०० वाजेपर्यंत : भव्य रक्तदान शिबिर

दुपारी ३.०० ते ४.०० : थेरो उपाधी दिक्षा विधी
सायंकाळी ४.०० ते ८.०० : परित्राण पाठ, धम्मदेसना, शुभेच्छा
सायंकाळी ५.०० ते १०.०० : प्रबोधनात्मक बुद्ध भिम गीते
या निळ्या निशानाखाली
निर्माती योगिता मोर्जे सह निर्माती के. श्वेताश्री
ऑनलाईन दाना करिता खालील नंबर वर पेमेंट करा .
GPay 8623887324 8369656783
पुज्य, भदन्त करुणासागर 8879843584
पुज्य भदन्त बाधिशिल 8459740464
पुज्य. भदन्त उपाली 8779803937

-: कार्यक्रमाचे स्थळ व दिनांक :- गुरुवार दि. २८ मार्च २०२४ रोजी सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत स्थळ : जयभिमनगर बुद्धविहार, कोलगेट ऑफिस समोर, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई-४०००७६