November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

People’s Education Society पीपल्स एज्युकेशन सोसायटी बचाव मोर्चा यशस्वी झाला

People’s Education Society : दिनांक 13 सप्टेंबर 2023 ला मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल नागसेनवन छावणी औरंगाबाद येथून सकाळी 11.30 वाजता निघून विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद वर तमाम भीमसैनिक बांधवाकडून आयोजित करण्यात आला होता. 

महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षित वंचित दीन दलित ,बहुजनांना मराठवाड्यात उच्च शिक्षण मिळावे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी PES च्या माध्यमातून औरंगाबाद येथे पहिले मिलिंद महाविद्यालय स्थापन केले त्या नंतर अनेक महाविद्यालये ( PES ) पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या माध्यमातून आज उभी राहिली आहेत ( PES ) पीपल्स एज्युकेशन सोसायटी मधून हजारोंच्या संख्येने प्राध्यापक ,वकील, अभियंते जजेस कलेक्टर, IPS अधिकारी डॉक्टर बनले आहेत या पैकी अनेक माजी विद्यार्थी सरकारी सेवेतूनसेवानिवृत्त झालेले आहेत.

आजच्या PES बचाव मोर्चात अनेक भीमसैनिकांनी आंबेडकरी चळवळीतील बांधवानी सहभाग घेतला होता ( PES ) पीपल्स एज्युकेशन सोसायटी बचाव मोर्चा काढण्यात आला याचे कारण ( PES ) पीपल्स एज्युकेशन सोसायटी  च्या मालकीच्या जागेवर अनेकांनी बेकायदेशीर अतिक्रमण केलेले असून ( PES ) पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन आणि संचालक मंडळ लक्ष देत नाही तसेच ( PES ) पीपल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये आर्थिक घोटाळे झाले आहेत अशी जनमानसात चर्चा सुरू आहे तसेच ( PES )पीपल्स एज्युकेशन सोसायटी संस्थे मध्ये काही विघ्न संतोषी मंडळी बेकायदेशीर हस्तक्षेप करीत आहेत आणि हा सर्व डाव उधळून लावण्यासाठी तमाम भीमसैनिकांच्या वतीने आज दिनांक 13 सप्टेंबर 2023 ला औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता यापुढे PES च्या जागेवर कोणीही अतिक्रमण करणार नाही याची जबादारी तुमची आमची सर्व भीमसैनिकांची आहे .आजचा ( PES ) पीपल्स एज्युकेशन सोसायटी मोर्चा यशस्वी झाला अशी माहिती देण्यात आली.