आषाढ पौर्णिमा (गुरू पौर्णिमा)
नमो बुद्धाय!
सविनय जयभिम!
बौध्द धम्मामध्ये आषाढ पौर्णिमेला विशेष महत्व आहे.कारण या दिवशी भगवंताच्या जिवनातील अनेक घटना याच दिवशी घडल्या आहे. त्यापैकी पहिली घटना म्हणजे महामायेला गर्भधारणा झाली.दूसरी घटना म्हणजे भगवंतानी सारनाथ या ठिकाणी पहिले धम्मचक्र प्रवर्तन करून आपल्या पाच शिष्याना प्रथम धम्मोपदेश दिला.त्यामुळे या शिष्यानी भगवंताला आपले गुरु मानले. म्हणून ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते.तिसरी घटना म्हणजेच याच दिवशी भिक्खू संघाची स्थापना झाली.अश्या अनेक महत्वपूर्ण घटना संयोगाने याच दिवशी घडल्या आहे.
तसेच वर्षावास परंपरेला देखील धम्मामध्ये अतिशय महत्व असून ही बुध्दकाळापासून चालत आलेली परंपरा आहे. याचे महत्व स्वतः तथागत भगवान बुध्द यांनी अनेक ठिकाणी वर्षावास करून पुजनीय भिक्खू संघ व श्रद्धावान उपासकांच्या समोर आदर्श ठेवले आहे या दिवशी आषाढ पौर्णिमेला जगभरातील पुजनीय भिक्खू संघाकडून वर्षावासाला प्रारंभ करण्यात येतो.ह्या वर्षावासाचा कालावधी हा आषाढ ते आश्विन असा तिन महिन्याचा असतो.
त्यामुळे तिन महिने सर्वत्र प्रत्येक बुध्दविहारात विपश्यना( ध्यानसाधना),त्रिरत्न वंदना, परित्राणपाठ,धम्मदेसना, बुध्द आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे वाचन, उपोसथ आदी. कृतिकार्यक्रम सुरु करण्यात येतात.त्यामुळे आपणदेखील या तिन महिन्यामध्ये शक्य होईल तेव्हा सहपरिवार बुध्दविहारात अथवा बुध्दलेणीवर जावून या कृतिकार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष आवर्जून सहभागी व्हावे. व इतरांना देखील सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे.तसेच स्वतः च्या घरी देखील आपल्याला तिन महिन्यात धम्म आचरण करून हे सुख मिळविता येईल त्यासाठी खालील सम्यक संकल्प यांना प्रत्यक्ष कृतिची जोड देणे आवश्यक आहे.
1) वर्षावासा दरम्यान प्रत्येक बौध्द व्यक्तीने दररोज सकाळी लवकर उठावे.
2) स्नान केल्यानंतर पुजास्थाना समोर दररोज सकाळी अथवा सायंकाळी शक्य असल्यास दोन्ही वेळेस 10 मिनिटे आनापान करून नियमित तिन महिने बुध्दवंदना घ्यावी.बुध्द वंदना घेणे म्हणजेच तथागत भगवान बुध्द व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्षी मानून काया वाचा व मनाने पंचशिल ग्रहण करणे.त्या प्रत्येक शिलाचे निर्धारपूर्वक पालन करणे होय.वर्षावासातील तिन महीने जर प्रत्येकाने सम्यक संकल्प करून दररोज असे नियमित पंचशिल प्रतिज्ञापूर्वक घेतले. तर त्याचा जिवनात खुपच मोठा लाभ होईल.
3) वर्षावासातील प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा, चतुर्दशी व दोन अष्टमीचे दिवस असे एकूण चार दिवस उपोसथ करून तन मन वाणी शुद्ध करावे.
4) वर्षावासा दरम्यान शक्यतो मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा.जर शक्यच नसेल तर मग किमान उपोसथाच्या दिवशी तरी मासांहार सेवन करूच नये.
——————————————–
वर्षावास प्रारंभ दिनांक – 13 जुलै 2022(बुधवार) ते दिनांक 9 ऑक्टोबर (रविवार) अश्विन पौर्णिमा
——————————————–
वर्षावासातील एकूण दिवस संख्या 88
उपोसथ दिवस संख्या 13
दि.13 जुलै (बुधवार) आषाढ पौर्णिमा
दि.20 जुलै (बुधवार) अष्टमी
दि.27 जुलै (बुधवार) चतुर्दशी
दि.5 ऑगस्ट (शुक्रवार) अष्टमी
दि.12 ऑगस्ट (शुक्रवार) ( श्रावण पौर्णिमा)
दि.19 ऑगस्ट (शुक्रवार)अष्टमी
दि.25 ऑगस्ट (गुरुवार) चतुर्दशी
दि.4 सप्टेंबर (रविवार)अष्टमी
दि.10 सप्टेंबर (शनिवार) (भाद्रपद पौर्णिमा)
दि.18 सप्टेंबर (रविवार) अष्टमी
दि.24 सप्टेंबर(शनिवार) चतुर्दशी
दि.3 ऑक्टोबर (सोमवार) अष्टमी
दि.9 ऑक्टोबर (रविवार) अश्विन पौर्णिमा
———————————————-
5) उपोसथाच्या दिवशी किंवा आठवडयात एकदा नियमित विपश्यना साधकांनी एकत्र येवून बुध्द विहारात किंवा निवास्थासनी सामुहिक ध्यान करावे. सर्वांप्रती मंगल कामना करावी.
6) दररोज शक्य असतील तितके बुध्द आणि त्यांचा धम्म या महान धम्मग्रंथाचे श्रद्धापूर्वक वाचन करावे.
चिंतन करावे. किंवा ऑडियो स्वरूपात श्रवण करावे.
7) वर्षावासा दरम्यान पुजनीय भिक्खू संघाला भोजनदान करावे. त्यासाठी घरी किंवा बुध्दविहारात भोजनदानासाठी आमंत्रित करून पुण्य अर्जित करावे.त्यादिवशी घरी सामुहिक ध्यानसाधना, परित्राणपाठ व धम्मदेसना आयोजित करून आपल्या नातेवाकांना व मित्र परिवार व शेजारी सर्वांना धम्म श्रवण करण्यासाठी निमंत्रित करावे.
त्यांच्या देखील अल्पोहाराची किंवा भोजनाची व्यवस्था करावी.खिरदान करावे.
8) वर्षावासा दरम्यान भोजनदाना व्यतिरिक्त वयोवृद्ध भिक्खूना औषधी, प्रवासख़र्च तसेच धम्मकार्य करण्यासाठी आवश्यक असलेली साधने दान स्वरूपात द्यावी.किंवा जिथे भिक्खू नसतील त्या परिसरातील बुध्द विहाराला वस्तू दान देता येतील.
बंधु व भगिनींनो,
वर्षावास हा जरी पुजनीय भिक्खू संघाचा असला तरीदेखील उपासकांच्या बाबतीत सुद्धा तो तितकाच महत्वाचा आहे.कारण प्रत्येकाचे धम्मआचरण सुधारण्यासाठी व पुण्यअर्जित करण्यासाठी ही संधी आहे.
त्यामुळे वर्षातील हे तिन महीने धम्माच्या दृष्टिने अतिशय महत्वपूर्ण असल्याने काया, वाचा व मनाने वरील आठ संकल्प पूर्णत्वास नेन्यासाठीच अधिष्ठानाची(पूर्ण निर्धार) व इच्छाशक्ती व नितांत श्रद्धा युक्त मनाची तयारी सर्वप्रथम आवश्यक आहे.त्यामुळे वर्षावासाचे महत्व लक्षात घेवून सर्वांनी या तिन महिन्यामध्ये धम्म आचरण करून वर्षावास निमित्त ठिकाणी ठिकाणी कार्यक्रम आयोजन करून ते यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने तन मन धनाने सहकार्य करावे.
पुजनीय भिक्खू संघाला
वर्षावासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा….
उपासकांना धम्मआचरण करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
💐💐💐
सबका मंगल हो !
(कृपया धम्मप्रचारार्थ ही पोस्ट सर्वत्र शेअर करावी ही विंनंती)
More Stories
अश्विन पौर्णिमा – अस्सयुज मासो Ashwin Purnima
भाद्रपद पौर्णिमा – पोट्ठपाद मासो Bhadrapada Poornima – Potthapada Maso
आषाढ पौर्णिमा Ashadha Purnima