श्रावण पौर्णिमा ( सावणो )
पुढील तीन घटनांसाठी बौद्धजगत या श्रावण पौर्णिमेस सदैव स्मरण करीत राहील .
१ – अंगुलीमालाची दीक्षा.
२ – अनाथपिंडळाने १६० सुत्त मुखोद्गत सांगितले.
३ – बौद्ध धम्माची पहिली विश्वसंगीती.
पहिली घटना : अंगुलीमालाची दीक्षा
महाकारूणिक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात ज्या अनेक अविस्मरणीय घटना घडल्या त्यापैकी अग्रश्रावक अंगुलीमालाची धम्म दीक्षा ही एक होय . पौर्णिमांचा आणि चांगल्या घटनांचा भगवंतांच्या जीवनात जणू माणिकांचनाचा योग आहे . वधशर्करेचा संयोग आहे , नीर – पंकज सानिध्य आहे . अंगुलीमालाची धम्म दीक्षाही श्रावण पौर्णिमेसच घडून आली , हाही एक दुर्मिळ योगायोगच भगवंताच्या जीवनात अनेक बाबी पौर्णिमेसच घडलेल्या दिसून येतात.
यापुढेही दिसून येणारे आहेत कोशलदेशाचा एक कुविख्यात चोर , डाकू दरोडेखोर , खूनी , नाव अंगुलीमाल , महाराजा प्रसेनजीताच्या राज्यात जालिनी नावाच्या जंगलात तो राहात असे. त्या जंगलातून जाणाऱ्या येणाऱ्या वाटसरूंना ठार मारून त्यांच्या हाताची करंगळी कापून गळ्यातील माळेत गुंफीत असे. अंगुलीची माळ तो आपल्या गळ्यात धारण करीत असे म्हणून त्याचे नाव अंगुलीमाल.
अंगुलीमाल हा हिंसा करीत असला तरी त्याचे मूळचे नाव अहिंसक , त्रिपिटकाच्य एका विशेष ग्रंथाच्या ( थेरीगाथाच्या ) वर्णनानूसार अशी माहिती मिळते की, त्याच्या वडिलांचे नाव ‘ भग्गव ‘ आणि आईचे नाव ‘ मैत्रायणी होते . भग्गव हा कोशल नरेश प्रसेनजीतच्या दरबारी राजपुरोहित होता. अंगुलीमाल लहानपणी कुशाग्रबुद्धी, व्रतसंपन्न, शीलवान, आज्ञाधारक, मृदुभाषी व गुरूभक्त विद्यार्थी होता . आचार्य मणिभद्र यांच्याकडे तो विद्यार्जनार्थ राहात होता. मेधावी असल्याने अनेक विद्या त्याने इतरांच्या मानाने लवकरच प्रहण केल्या. त्यामुळे तो मणिभद्राचा आवडता शिष्य बनला हे गुरुजीधे अहिंसकावरील प्रेम पाहवले नाही खोटेनाटे काहीही सांगून पानी गुरुजी मर्जी अहिंसकाविरुद्ध करण्यात करविण्यात यश मिळविले . आश्रमात हिसाबरोबर विद्यापण करण्यासाठी आलेल्या इतर बालकांच्या खोटचा कांगाळी रागावले मणिभद्रांनी मोठ्या युक्तीने त्याच्याकडून एक हजार माणसांची करून पुरावा सादर करण्याची गुरुदक्षिणा मागितली . आज्ञाधारक अहिंसक कामास लागला मिळेल त्याची तो हत्या करू लागला. मारलेल्या गणनेसाठी अहिंसक मारलेल्यांची करंगळी कापून माळेत ओवत असे. सदाचारी तरुण दुराचारी बनला. अहिंसकाचा हिंसक बनला मैत्रीधर्म हून कुरव गुरुदक्षिण आली होती. त्याने आपल्या गळ्यातील करंगळीची संख्या मोजली.
९९९ भरतं आता एकच हत्या हवी होती. एकदा भगवंत श्रावस्ती येथील जेतवनात असतान त्यांनी अंगुलीमालास सदाचारी मनुष्य बनविण्याचे ठरविले. आपले चीतर व भिक्षावा घेऊन या अंगुलीमालाला शोधण्यासाठी तथागत एकटेच जालिनी जंगल कडे निघते जेथे पाच – पन्नास जणांचा समूह मिळूनही या जंगलात येण्याचा विचार करू शकत नहता, तेथे एकट्या शाक्यमुनीनां येताना पाहून तथागतास उद्देशून अंगुलीमाल म्हणाल ” श्रमणा थांब ” यावर अतिशय शांत व मृदू स्वरात भगवंतानी त्यास उत्तर दिले अंगुलीमाला ! मी तर केव्हाच थांबलो आहे. पण पापकर्म करण्यापासून तू की यांबशील ? केवळ तुझ्यासाठी मी येथे आलो आहे. दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय ? तुला मी आपलासा करावा , सदाचाराच्या मार्गावर आणावा म्हणून तुझ्याकडे आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही. तुझ्या हृयातील कुशल अजून्हें जिवंत आहे आणि जर तू त्यास अवसर देशील तर तुझा कायापालट होईल. जर तु तूझ्यातील सद्धम्मास संधी देशील तर त्यामुळे तुझ्यात फार मोठा बदल घडून येईल व स्त्री – पुरुष , बालक वृद्ध , वाटसरूंची हत्या करताना तुला त्यापासून काहीही लाभ होगर नाही. रोजच्या रोज अधिकाधिक पापांचा धनी मात्र तू बनत चालला आहेस. या अंगुलीमालानी असे म्हटले की , मग मी काय करू भगवन् ? ” तेथील एका वृक्ष निर्देश करून तथागत अंगुलीमालास म्हणाले , ” त्या झाडाचे एक पान तोडून आण पाहू !” अंगुलीमालाने त्या झाडाकडे त्वरीत झडप घेऊन त्याचे एक पान तोडले व भगवंतांच्या समोर धरून म्हणाला, हे पहा तथागत ! तोडून आणले पान. हे काही कठीण काम आहे की काय ? ” यावर त्यास भगवंत म्हणाले , ” छान ! आता माझ्यासाठी आणखी एक लहानसे काम कर. हेच पान परत त्या झाडास जोडून ये . ” त्यावर मात्र म्हणाला , हे कसे शक्य आहे भगवंत ? तोडलेले पान कधी जोडता येते काय ? त्यावर तथागत म्हणाले , ” अरे ! तू किती भोळा आहेस ? तुला एवढेही माहिती नाही , ज्याला जोडता येत नाही, त्याला तोडायचे नसते बरं. जर तुला कोणास जीवन देता येत नसे त तर ते घेण्याचे तरी पातक कशाला करतोस ? ”
यावर नजर वर करून अंगुलीमालाने भगवतांच्या प्रभायुक्त , दैदिप्यमान , शांत चेहयाकडे पाहिले. हातातील तलवार व गळ्यातील माळ फेकून दिली आणि दुसन्या क्षणी भगवंताच्या चरणावर पडून मोठमोठ्याने रडू लागला नि त्याला आपल्या कृत्यावर मोठाच पश्चाताप झाला. नंतर त्याने रडता रहताच तथागतांकडे पाहून धम्माची दीक्षा देण्याची याचना केली. यावर तथागतांनी त्यास उद्देशून से म्हटले की, भिक्ख आवे ! ” अशा शब्दाने संबोधून भगवंतानी त्यास दीक्षित केले. त्यास सोबत घेऊन श्रावस्तीच्या जेतवनारामाकडे प्रयाण केले. ज्या दिवशी या
अंगुलीमालास दीक्षा देण्यात आली तो दिवस होता श्रावण पौर्णिमा इ.स.पू. ५०४ चा बौद्ध जगतात ऐसी अप्रभावक मान्यात येतात. त्यातील एक अग्रश्रावक म्हणजे अंगुलीमाल होय.
ज्या अंगुलीमालास राजा प्रसेनजीत आपली बलाढ्य सेना , तीर – तलावर यांचा वापर करूनही पराभूत करू शकला नाही, त्या क्रूरकर्म्यास केवळ आपल्या करुणा बलाने तथागताने एक भिक्खू बनविले. भगवंताची केवढी ही किमया !
दुसरी घटना : अनाथपिंडळाने १६० सुत्त मुखोद्गगत सांगितले
भगवंताच्या काळात जंबुद्वीप ( भारतवर्ष ) एक प्रसिद्ध व्यापारी केंद्र म्हणून साऱ्या जगात ख्यातीप्राप्त होते . मोठमोठ्या नगरांतून आणि प्रांताची राजधानी असलेल्या शहरातून भारतभर व भारताबाहेरही व्यापार वाणिज्य चालत छोटया – छोटया राज्यात तेव्हाचा भारत विभागला गेला होता. श्रावस्ती ( काशी – कोशल देशाची राजधानी ), राजगृह ( अंग – मगध देशाची राजधानी ), कोसांबी ( वत्स देशाची राजधानी ), उज्जयनी ( अवंती देशाची राजधानी ) तक्षशिला ( गांधारची राजधानी ) इ . शहरांतून देश – विदेशात व्यापार चाले . त्याचबरोबर भद्दिया , वाराणसी , भरूकच्छ अर्थात भंडोच , शूर्परिक ( सोपारा ) इ शहरेही वाणिज्य केंद्र म्हणून नावारूपास आलेली होती .
वरील सर्व शहरांतील अनेक व्यापारी भगवंतांचे उपासक होते. या सर्वांमध्ये श्रावस्तीचा एक धनाढ्य व्यापारी सुदत याचे स्थान उपासकांमध्ये सर्वात उंच होते. अनाथांसाठी त्याचे भांडारगृह नेहमी खुले असे. अनाथांना ‘ पिंड ‘ म्हणजे भोजन देणारा म्हणून लोक त्यास अनाथपिंडक या नावाने ओळखत.
श्रावस्तीच्या बाजारात विविध वस्तू खरीदण्यासाठी दूरदूरच्या ठिकाणांहून व्यापारी येत बाजारात आल्यानंतर ते इथल्या व्यापाऱ्यांना विचारत इथे काय मिळते ? ” ( कि भडं अस्थि ) तर त्यांना येथील व्यापारांकडून असेच उत्तर मिळत असे की. इथे सर्व काही मिळते. ( सब्बं अस्थि ! ) या उत्तरावरूनच या शहराचे नाव सब्बं अस्थि म्हणजे सावत्थी वा श्रावस्ती असे पडले.
एकदा सुदत्त आपला मेहुणा धनपाल यास भेटण्यासाठी श्रावस्तीहून राजगृह येथे आला धनपाल हा राजगृहाचा नगरश्रेष्ठी होता. आज धनपाल कोणत्या तरी कामात इतका व्यस्त मग्न होता की सुदत्तास क्षेम – कुशल विचारण्यापलीकडे त्यास तो अधिक वेळ देऊ शकला नाही. सुदत्ताने धनपालास विचारले . ” गृहपती ! तुझ्या घरी असा कोणता महायज्ञ किंवा कोणता विवाह उत्सव होणार आहे की काय ? की मगधराज
बिंबीसारास तू तुझ्या घरी येण्याचे निमंत्रण दिले आहेस ? एवढ्या एकाग्रतेने, कोणाच्या
सत्काराच्या तयारीस लागला आहेस ? ”
या प्रश्नांच्या उत्तरी राजगृहश्रेष्ठीने उत्तर दिले , ” सुदत्त ! माझ्या घरी कोणत्या विवाह समारंभाचे आयोजन नाही. मगधराज बिंबीसारालाही मी निमंत्रित केलेले नाही. याचे खरे कारण हे आहे की, शाक्यमुनी भगवान तथागत है आपल्या एक हजार भिक्खुसंधासह उद्या प्रातः काली भोजनासाठी माझ्या घरी येणार आहेत . त्याच्या तय तयारीमध्ये मी मग्न झालो आहे.
हे उत्तर ऐकून सुदत्तास फार आनंद झाला. या निमित्ताने मला भगवताचे दर्शन होईल , असे त्यास वाटले . तथागतांच्या भेटीसाठी आतूर झालेल्या सुदताने मोठ्य कष्टाने ती रात्र घालविली. दुसऱ्या दिवशी धनपालाच्या घरी भगवंत भोजनासाठी येण्यापर्यंतच्या वेळेपावेतोही सुदत्त थांबु शकला नाही. अगदी पहाटेच तथागत जेथे थांबले, त्या “शीतवन विहारा”कडे सुदत्त एकटाच चालता झाला . दुरूनच अनायपिंडवास आपल्याकडे येताना पाहून तथागत म्हणाले , ” आवे सुदत ! ” भगवंतानी स्वतः आपल्यात आपल्या घरच्या नावाने बोलावलेले ऐकून तो गहिवरून गेला. पुढच्याच क्षणी भगवंताल शरण येऊन त्याने विनंती केली की, ” पुढच्या वर्षीचा वर्षावास भगवंतानी श्र्वावस्ती येथे राहून संपन्न करावा. ” मौन राहून भगवंतानी ते निमंत्रण स्वीकारले. संघासह श्रावस्तीस येणार म्हणून त्यांच्या स्वागताच्या पूर्वतयारीस सुदत्त लगेच लागला. पायी येताना भगवंताचा व भिक्खू संघाचा मुक्काम जेथे जेथे पडणार बांधून त्याने त्या त्या ठिकाणी भव्य विहारे बांधली. बागा बनविल्या विहिरी खोदल्या वर्षावासाच्या कालावधीत राहण्यासाठी श्रावस्तीमध्ये योग्य विहार बांधावा असा त्याच विचार होता. जागेचा शोध घेतला असता त्यास जी जागा पसंत पडली ती राजकुमार जेत यांची होती. जागेच्या क्षेत्रफळावरोवर सुवर्णमुद्रा अंथरून त्याने ती जागा खरेदी केली. तेथे एक भव्य विहार बांधला. भगवंतासाठी स्वतंत्र व भिक्खूसंघासाठी स्वतंत्र विश्रांतीस्थाने बांधली. एवढे करूनही जी थोडीफार जागा शिल्लक होती, ती राजकुमारने मोफत भगवंतासाठी देऊ केली. तेवढ्या दानाच्या मोबदल्यात त्या संपूर्ण परिसरात अनाथपिंडकाने आपले नाव न देता राजकुमाराच्या नावावरून ‘ जेतवन ‘ असे नाव दिले.
बौद्ध धम्माच्या इतिहासात या जेतवनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ४५ वर्षांच्या आपल्या बुद्धत्वप्राप्तीनंतरच्या आयुष्यात भगवंतानी आपले २५ वर्षावासाचे दिवस या एकट्या श्रावस्तीत घालविले. विनयपिटकाच्या ३०० शिक्षापदांपैकी २९४ पदे
श्रावस्तीत उपदेशिली गेली . संयुक्त निकाय आणि अंगुत्तर निकायचेही अधिकांश उपदेश
या जेतवनातच दिले गेले. मज्झिमनिकायनुसार जी सुत्ते भगवंतानी सांगितली त्यातीत ६५ सुत्ते श्रावस्तीत दिली गेली .
अनाथपिंडकाची धम्म भक्ती , भगवंतावरील श्रद्धा , त्याने केलेले धम्मदान यास बौद्ध इतिहासात अन्यत्र तोड नाही. अनाथपिंडकांनी तथागतचरणी धम्मदिक्षेवी अशी विनंती केली होती की , मला उपासक म्हणून दीक्षित करावे . ” तेव्हा भगवंतानी त्यास गृहस्थ शिष्याची ( उपासकाची ) दीक्षा दिली, तो दररोज तीन वेळा भगवंताच्या दर्शनासाठी व धम्मदेसना ऐकण्यासाठी जेतवनात जात असे. अनाथपिडकाबद्दल भगवन एका ठिकाणी सांगतात , “ सुदत्ताने एका पौर्णिमेस ( श्रावण पौर्णिमेस ) १६० सुत्त महिलांना मुखोद्गत सांगितले . ” एवढे त्याचे पाठांतर अद्भुत होते.
तिसरी घटना : बौद्ध धम्माची पहिली विश्वसंगीती
विश्व बौद्ध महासंमेलनास संगीती असे म्हणतात. भगवान सम्यक सम्बुद्धाच्या सर्व धम्मनियमांचे संगायन करणे, आचारसंहिता बनविणे, संघशासन अबाधित ठेवणे, धम्मास आलेल्या शिथिलतेस प्रतिबंध करणे इ . उद्देशाने भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्याने पहिली विश्व धम्म संगीती राजगृह येथे भरविण्यात आली. अशाप्रकारे पुढे – पुढे एकंदर अशा आठ संगीती भरविण्यात आल्या.
पहिली धम्म महासभा राजगृहाच्या वैभार पर्वतावर सप्तपर्णी नामक गुहेत संपन्न झाली. या प्रथम धम्म संगीतीचे अध्यक्ष होते पूज्य भदंत महास्थवीर महाकश्यप, तथागतांच्या निर्वाणाच्या वेळी त्यांचे ज्येष्ठ शिष्य भिक्खु सारिपुत्त व महामोग्गल्यायन हे दोघेही हयात नव्हते. त्या काळी लिपीचा शोधही लागलेला नव्हता . त्यामुळे बुद्ध वचने पदे सुत्त हे सर्वच त्यांच्या शिष्यांनी कंठस्थ केली होती. त्यात थोडाफार बदल होण्याची भीती होती. तसेच बुद्धवचनाचे पदाचे नी सुत्ताचे शुद्धत्व राखण्यासाठी व त्याच्या सुसंगत संकलनासाठी धम्मसंगीतीचे आयोजन करणे गरजेचे होते. या संगीतीच्या प्रयोजनामागे आणखी एक उद्देश होता. तो म्हणजे भगवंताच्या निर्वाणानंतर सुभद्रादी काही भिक्खू बौद्ध आचारांचे काटेकोर पालन करीत नव्हते. आचारधर्मात शिथिलता आणीत होते. त्यास प्रतिबंध करणेही नितांत आवश्य होते .
( संदर्भ :– बारा पौर्णिमांचे महत्व – प्रकाशक – भदंत आर. धम्मांकुर थेरो ) सम्बोछि प्रकाशन
More Stories
अश्विन पौर्णिमा – अस्सयुज मासो Ashwin Purnima
भाद्रपद पौर्णिमा – पोट्ठपाद मासो Bhadrapada Poornima – Potthapada Maso
आषाढ पौर्णिमा Ashadha Purnima