बाबा तुम्ही नसतात तर
हे जीवन व्यर्थ असते
तुम्ही नसण्याच्या कल्पणेने
वादळ मनात उठते ॥
तुम्ही नसतात तर बाबा
कुठली असती लेखनी आमच्या हाती
बोज असते जीवन
अन कोपली असती माती ॥
तुम्ही नसतात तर बाबा
गुलामीने छळले असते
बापावानी माया करणारे
जगात दूसरे कोणी नसते ॥
तुम्ही होतात म्हणुन
आम्ही आहोत बाबा
तुमच्या त्यागामुळेच
आली जीवनाला शोभा
तुम्ही नसतात तर बाबा
कोणी देव दासी असती कोणी मुरुळी
सुखाने आमची कधी
भरलीच नसती झोळी ॥
तुम्ही नसतात तर बाबा
गुलामिची जानीव ही नसती
तडफडत जगलो असतो
आयुष्य सार कष्टी ॥
तुम्ही नसतात तर बाबा
कवडीमोल असती आमची किम्मत
तुमच्या खंबीर नेतृत्वाने
आली आमच्यात हिम्मत ॥
तुम्ही नसतात तर बाबा
ह्या जाणीवेनेच काळीज चिरत
तुम्ही आमच्यासाठी खूप झीजलात
म्हणुनच तुमच्या त्यागाच बलीदान उच्च पदी ठरत ॥
तुमच्यामुळे लोक आज
शिकुन तर मोठे झालेत
स्वःताहाचा स्वर्थ साधुन
तुम्हालाच विसरून गेलेत ॥
तुम्ही नसतात तर बाबा
हे कत्तई झाले नसते
लंगोटी गुंडाळून ईथे पतर वाळीतील
उष्ट अन्न शोधत बसले असते ॥
सौ. सविता कांबळे , कर्जत रायगड 8850243253
More Stories
बुद्धपौर्णिमेचं चांदणं
रात्र ती वैरीण
माझं काम मी केलं…..