February 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

लेणीं संवर्धकांचे यश – कुडा बुद्ध लेणीं

इ.स.पूर्व पहिल्या शतकातील, कुडा गावातील डोंगरावर स्थित कुडा बुद्ध लेणीं येथे २६ लेणीं कोरलेल्या असून त्यात ३१ शिलालेख आहेत. एवढी प्राचीन लेणीं असून देखील ASI ने तेथे कोणतीही सुविधा केली नव्हती. दारांना व खिडक्यांना दरवाजे नव्हते की सुरक्षा रक्षक नाही.
मात्र गेली अनेक वर्षांपासून लेणीं संवर्धक तेथे नियमित जातात व या लेणीं संदर्भात पाठपुरावा करतात. यात विशेष प्रयत्न केले प्रशांत माळी यांनी. त्यांना साथ दिली तरुण लेणीं संवर्धक Saurabh Bhosale याने. सौरभ सतत जाऊन तेथे कार्यशाळा घेत होता, माहितीचा अधिकार वापरत होता…
आज विशेष आनंद वाटतो सांगायला की कुडा बुद्ध लेणींला आता संरक्षक जाळी आणि दरवाजे बसवले गेले आहेत. त्यामुळे तेथे होणारी काही अनौतिक कृत्ये आता बऱ्यापैकी थांबणार आहेत.
तेथील अधीक्षक, श्री. येळीकर यांच्याशी मी आज बोलून आढावा घेतला. लवकरच तेथे ASI चा नामफलक, तसेच पादत्राणे काढण्याचे फलक, मुख्य गेट आणि काही तुटलेल्या खिडक्यांना डागडुजी करून संरक्षित जाळी बसविण्यात येणार आहे. या कामात “ट्रिबिल्स” संस्था आणि सर्व लेणीं संवर्धक सर्वोतोपरी मदत करेल असे मी त्यांना आश्वासन दिले आहे.
या सर्व कामात तळा गावातील भारतीय बौद्ध महासभेच्या अधिकाऱ्यांनी खूप चांगली साथ दिली.
संयमाने आणि अतिशय वैधानिक तऱ्हेने काम करून यश मिळवल्याबद्दल सर्व लेणीं संवर्धकांचे अभिनंदन..
अतुल भोसेकर