मध्यप्रदेश मध्ये उज्जैन शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर सोडंग नावाचे गाव आहे. येथील छोटी टेकडी आणि प्राचीन अवशेष पाहून १९८८-८९ दरम्यान विक्रम विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाचे रेहमान अली आणि अशोक त्रिपाठी यांनी उत्खनन केले. येथे मोठ्या प्रमाणात बौद्ध संस्कृतीचे अवशेष प्राप्त झाले. त्याबाबतचा अहवाल भारतीय पुरातत्व खात्यामार्फत १९८८-८९ मध्ये प्रसिद्ध झाला. तसेच उज्जैन प्रांतातील बौद्ध अवशेष हा अहवाल २००४ मध्ये प्रसिद्ध झाला.
सोडंग येथील उत्खननात क्षिप्रा नदीच्या किनारी असलेला स्तूप आढळला. तसेच तेथून शंभर मिटर अंतरावर एक विहार आढळले. दीड हजार वस्तीचे गाव विहार व स्तूपाच्या आजूबाजूस वसले गेले असल्याने बौद्ध संस्कृतीच्या प्राचीन अवशेषांना क्षती पोहोचली. तेथील निरक्षर लोकांनी माती,विटा, कलाकुसर असलेले दगड आणि स्तंभ घर बांधकामात वापरले. त्या गावातील महंताला देखील हेच हवे होते. प्राचीन बौद्ध संस्कृतीचे अवशेष या वर्गाला नकोसे वाटतात. क्षतिग्रस्त बुद्धमूर्ती, शिल्पे दिसत असून देखील “ये देवी का पुराना मंदिर है।” असे लोकांना ते आजही सांगतात.
वास्तविक या गावातील ४० टक्के लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. पण त्यांनी देखील खरा इतिहास समजून घेतला नाही. पुरोहिताच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. आज ही भग्न झालेली उघड्यावरील शिल्पे पाहताना वेदना होतात. सर्व मध्यप्रदेशमध्ये अनेक ठिकाणी असेच झालेले जाणवते. वास्तविक सम्राट अशोक यांचे उज्जैन येथे एकेकाळी वास्तव्य असलेला मध्यप्रदेश हा खरेतर बुद्धप्रदेश आहे. स्तुप, विहार, लेणी यांचे अगणित अवशेष तेथे आढळतात. पण पुरोहित आणि अन्य उच्च वर्गाने खरा इतिहास उघड करू दिला नाही. वैश्य टेकडीचे उत्खनन बंद करण्यात यांचाच हात होता. तरी सत्य सदासर्वदा लपून रहात नाही. जे जाणकार आहेत ते अशा स्थळांना भेट देऊन खरा इतिहास जगापुढे आणतात. सागर कांबळे यांच्या टीमचे यासाठी मी
अभिनंदन
करतो.
—संजय सावंत https://sanjaysat.in
More Stories
हरेगावात१६ वी बौद्ध धम्म परिषद उत्साहात संपन्न; भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
बार्टी पुस्तक स्टॉलवर ग्रंथ खरेदीसाठी भीम अनुयायांची प्रचंड गर्दी हजारो ग्रंथाची विक्री
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी परभणीत तांदळापासून साकारली त्यांची प्रतिकृती