November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

सम्राट अशोक जयंती त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे विविध उपक्रमांनी होणार साजरी

अशोक कालीन धम्मलिपि कार्यशाळा व विशेष व्याख्यानाचे आयोजन

महान धम्म प्रचारक, देवानामपियतिस्स, चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती सालाबादप्रमाणे यंदाही ऐतिहासिक त्रिरश्मी बुध्दलेणी या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त ऑनलाइन निबंध स्पर्धा, धम्म गौरव रैली, धम्म लिपि कार्यशाळा, लेणी अभ्यास सहल, सम्राट अशोक यांच्या कार्याविषयी माहिती देणारे
विशेष व्याख्यान आदी. कार्यक्रम सम्राट अशोक जयंती महोत्सव समिती आणि त्रिरश्मी बुध्दलेणी उपासक उपासिका संघाच्या वतीने सकाळी ७ ते १२ यावेळेत त्रिरश्मी बुध्दलेणीवर संपन्न होतील. तरी या कार्यक्रमास आपण तन मन धन रूपाने आपले मोलाचे योगदान देवून या महोत्सवाला पांढरे शुभ्र् वस्त्रे परिधान करून सहपरिवार वेळेवर उपस्थित रहावे असे नम्र आवाहन आयोजकांनी केले असून
कार्यक्रम रूपरेषा खालील प्रमाणे आहे –
वेळ:सकाळी ०७:०० वा.त्रिरश्मी लेणी च्या पायथ्याशी बुद्ध स्तूप येथे सर्वांनी जमणे. वेळ:सकाळी ०७:३० ते ०८:००
बुध्दस्तुपात सामुहिक अभिवादन
सम्राट अशोक जिवन गौरव रैली
बुद्धस्तूप ते त्रिरश्मी बुध्दलेणी.
वेळ:सकाळी ०८:३० ते ०९:३०
लेणी अभ्यास सहल व धम्मलिपी कार्यशाळा व शिलालेख वाचन
🎤मार्गदर्शक-आयु. सुनिल खरे सर
(धम्मलिपि तज्ञ/ लेणी अभ्यासक नाशिक), वेळ:सकाळी ०९:३० ते १०:१५
अल्पोहार ,खिरदान वेळ:सकाळी १०:३० ते ११:४५
सम्राट अशोक यांच्या जीवन कार्याविषयी विशेष व्याख्यान-मार्गदर्शक-आयु. अतुल भोसेकर सर
(बौद्ध संस्कृतीचे गाढे अभ्यासक/ लेणी अभ्यासक/ साहित्यिक / लिपितज्ञ),
टिप:निबंध/ चित्रकला (पेंटिंग)/घोषवाक्य (स्लोगन)स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी सम्राट अशोक यांच्या जिवनावर आधारित निबंध/चित्र (पेंटिंग्स)घोषवाक्य(स्लोगन) जयंती उत्सव समिती सदस्यांकडे व्हाट्सएप वर पाठवावे. किंवा प्रत्यक्ष भेटून जमा करावे.(अंतिम मुदत 5 एप्रिल) स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या स्पर्धकांचा सम्राट अशोक जयंतीदिनी विशेष मान्यवरांच्या हस्ते गौरव व शेवटी आभारप्रदर्शन अशी रूपरेषा कार्यक्रमाची ठरवण्यात आली आहे,
स्पर्धेत सहभागी होऊन घोषवाक्य, चित्रकला व निबंध खालील क्रमांकाच्या व्हाट्सएपवर पाठवू शकता, किंवा प्रत्यक्ष भेटून देऊ शकता,
संतोष आंभोरे मो.8668300637
अंकित दोन्दे 9175151111
प्रविण जाधव मो.9325448815
सचिन गायकवाड सर मो.8668419368
नितिन पिंपळीस्कर 9762286371
महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव प्रचारक व प्रसारक समिती पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे,
– पि. कुमार धनविजय (दादा),वामन पवार गुरुजी,संपत शिंदे गुरुजी ,संजय भरीत गुरुजी,भरत यशवंते ,अनिरुद्ध कसबे,बौद्धाचार्य मिलिंद बनसोडे , विनोद त्रिभुवन , प्रशांत त्रिभुवन , विजय कापडणे, सिद्धार्थ भालेराव, सतिश तिर्थे, अनिल बागुल, सचिन गायकवाड़, शशीकुमार सुलताने, प्रमोद नरवाडे, किरण काऊतकर, भारत भवरे, अमोल खंदारे, विशाल वाकळे, सुभाष राऊत, भगवान पगारे, सत्यजित इंगोले, अशोक गवई, सिद्धार्थ सपकाळे, प्रशांत उन्हवणे, कैलास बोढारे, वैशाली ताई जाधव, सोनाली दोन्दे,प्रभाकर लोखंडे, अनिकेत चव्हाण, अनिकेत पानपाटील, आकाश खरे, कविता खरे, रवींद्र पाटील, सिद्धार्थ खरे, सागर वाघ, आकाश भालेराव, विकी वाकळे, मनोहर खरे, नाना साबळे, बिपिन गायकवाड, राहुल निकाळे, सागर रामटेके , सर्जेराव गवई ,राहुल बनसोडे , अनिल नन्नवरे ,प्रविण धिवरे , सुशीलकुमार पवार ,सचिन अंभोरे , बाळासाहेब पाईकराव ,देवीदास गायकवाड आदी प्रचार प्रसार समिती कामकाज पाहत आहे .