February 22, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

महान चक्रवर्ती सम्राट अशोक २३२७ जयंती नाशिक शहरात उत्साहात साजरी 

नाशिक मधील विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३२७ वी जयंती  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, सकाळी अशोकस्तंभास मानवंदना देऊन त्रिशरण पंचशील व बुद्धवंदना, पूजनीय भिक्खू संघाद्वारे धम्मध्वज वंदना पूजा करण्यात आली.

दुपारी भिक्खू संघास भोजन दान करून उपासकांचे भोजन झाले. त्यानंतर मान्यवरांचे लेणी कार्यशाळा व सम्राट अशोक यांच्या कार्यावर व्याख्यान झाले. व्याख्याते अँड. प्रविण पंडित यांनी सम्राट अशोक यांचे जीवनचरित्र उलगडून सांगितले. बुद्ध धम्म प्रचार प्रसारासाठी केलेल्या अमूल्य कार्याबद्दल नाशिक जिल्ह्याच्या वतीने पंडित यांना अशोक रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

दुपारी १ ते ५ त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे दानपरमिता फाऊंडेशन च्या वतीने कार्यशाळा संपन्न झाली. शिलालेख, शिल्पकला, लेणी स्थापत्यकला याबद्दल माहिती देण्यात आली. सम्राट अशोक जयंती महोत्सव समितीच्या वतीने कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंतीनिमित्ताने शहरातील मध्यवर्ती असलेल्या अशोक स्तंभ ते त्रिरश्मी बुध्दलेणी बाइकरैली,पुजनीय भिक्खू संघाला भोजनदान व संघदान,धम्मप्रवचन,लेणी कार्यशाळा,वृक्षारोपण आदी संपन्न झाले. महान चक्रवर्ती सम्राट अशोक जयंतीनिमित्ताने ठाणे, रत्नागिरी, जळगांव,अहमदनगर व इतर जिल्ह्यातील धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद बनसोड यांनी केले या वर्षीचा अशोकरत्न पुरस्कार आयु.प्रविण पंडित ( संस्थापक अध्यक्ष धम्मकाया फाउंडेशन ) मुंबई यांना प्रदान करण्यात आला.

मोहन भाऊ आडांगळे, अंकित दोंदे,सुनील खरे, संतोष आंभोरे, नितीन पिंपळीसकर, प्रवीण जाधव, अनिकेत चव्हाण, विनोद त्रिभुवन, मंदाकिनी दाणी, सोनाली ताई दोंदे, रोहणी जाधव, मंगल बोडारे, अनिता शिरसाठ, सुलोचना वाघ, बाळासाहेब शिंदे, ताराचंद जाधव, मनोज मोरे, संविधान गायकवाड कल्पना नेरकर,तसेच समाज्यातील अनेक मान्यवर चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती मध्ये उपस्थित होते.