February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

 होके परीवार आणि जाधव परिवाराचे क्रांतीकारक पाऊल

 दिनांक 21/ 7 /2021 रोजी लातूर येथे पुन्हा एक ब्राह्मणी व्यवस्था झुगारून बौद्ध धम्म पद्धतीने मंगल परिणय सोहळा पार पडला आहे
होके परिवार हा बौद्ध असून लातूर येथे राहतात. जाधव परिवार हे कैकाडी समाजाचे आहेत ते पुणे येथे लोहगाव, टींगरे नगरला राहतात होके सर हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत व मुलीचे वडील जलसिंचन खात्यामध्ये नोकरीस आहेत

माझे चळवळील सहकारी पुणे येथील रहिवासी विश्वनाथ माने यांची भाच्ची आहे, तसेच दुसरे माझे चळवळीतील सहकारी अनिल माने सोलापूर ,यांचे नातेवाईक आहेत हा सर्व परीवार माझ्या जवळच्या नातेवाईकांपैकी आहे जाधव साहेब यांची मुलगी, होके सरांचा मुलगा ,दोघांचा मंगल परिणय लातूर येथे हाँटेल कार्निवल मध्ये छोटेखानी कोरोनाचे नियम पाळून मोठ्या थाटामाटात पार पडला आहे
मी त्या मंगलमय प्रसंगी प्रत्यक्ष हजर राहून मुलाला व मुलीला मंगल कामना दिल्या आहेत आणि होके परिवार व जाधव परिवार यांना धन्यवाद दिले
होके सरांचा मुलगा यूपीएससी करत आहे. जाधव परिवारातील मुलगी नुकतीच एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन जेजुरी या ठिकाणी सी ई ओ या पदावर कार्यरत आहे. तसेच होके सरांचे लहान चिरंजीव हे यूपीएससी मार्फत आय आर एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊन सोलापूर येथे रेल्वे मध्ये कमिशनर आहेत दोन्ही परिवार उच्च विद्याविभूषित आहे
त्यामुळे दोन्ही परिवारांचे श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्यामार्फत तसेच आंबेडकरी परिवारा मार्फत मी अभिनंदन करीत आहे
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व तथागत भगवान गौतम बुद्धाने दाखविलेल्या मार्गाने जाण्याचा संकल्प दोन्ही परिवाराने केलेला आहे त्यामुळेच हा मंगल परिणय सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे मुलीकडील सर्व परिवार या मंगलमय प्रसंगी प्रत्यक्षपणे सर्व नातेवाईकासहित हजर होता या प्रसंगी मी कैकाडी समाज बांधवांना महिला भगिनींना आव्हान केले की इथून पुढे आपण सर्वांनी बौद्ध धम्म पद्धतीने सर्व संस्कार करावेत आंबेडकरी जनता आपल्यापाठीशी खंबीरपणे उभी आहे, उभी राहणार आहे अशा प्रकारचा विश्वास मी त्या ठिकाणी जमलेल्या सर्व कैकाडी बांधवांना दिला
आणि तरून मुलांना व तरुण मुलींना आव्हान केले की आपण देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्धाने जो आपणास धम्म दिलेला आहे त्या धम्माचे पालन करून इथून पुढील भविष्यात अशाच प्रकारचे मंगल परिणय सोहळे घडवून आणावेत
या मंगलमय परीणया प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते प्रा एस के जोगदंड सर, लंकेश येडे सर, भुंबे सर वंचित बहुजन आघाडीचे जी उपाध्यक्ष शैलेश कांबळे ,अ‍ॅड.लोखंडे,अ‍ॅड.निकाळजे इत्यादी प्रमूख मंडळी हजर होती