August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

चैत्यभूमी आणि दिक्षाभूमीला राष्ट्रपतींनी भेट देण्याची अपेक्षा रामदास आठवलेंनी व्यक्त केली .

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट

नविदिल्ली  – राष्ट्रपती महामहिम दौपदी मुर्मु यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सदिच्छा भेट घेतली.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूर मधील दिक्षाभूमी येथील स्मारकाला राष्ट्रपतींनी भेट द्यावी अशी अपेक्षा यावेळी झालेल्या चर्चेत ना.रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींना व्यक्त केली. तसेच अनेक सामाजिक प्रश्नावर सुद्धा चर्चा करण्यात आली
त्यावर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना आपण जरूर चैत्यभूमी आणि दिक्षाभूमी येथे भेट देऊ असे आश्वासन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिले.
सदर भेट प्रसंगी  रिपाईचे राष्ट्रीय नेते मा. भुपेशजी थुलकर साहेब ,विनोदजी निकाळजे साहेब यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते..