नाशिक : आरक्षणाचे जनक आणि संपूर्ण शोषित पीडित जनतेचे कैवारी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिक येथे आदरणीय प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी गणेशभाई म्हटले की देशात आरक्षण असेल तसेच अनेक मोठे मोठे प्रकल्प म्हणजे पाण्याचे,शिक्षणाचे झाडांच्या नियोजन अशा अनेक समाज उपयोगी कामे करून देशापुढे आणि जगापुढे मोठा आदर्श शाहू महाराजांच्या कार्याने आपल्यापुढे ठेवला आहे शाळेत विद्यार्थी गैरहजर राहू नये त्याला सामान्य दंड आकारणी असे देखील शाहू महाराजांनी सर्व लोकांनी शाळा शिकावी हा मानस त्यांचा होता म्हणून शिक्षणाचे महत्त्व देशातील नागरिकांना त्यांनी पटवून दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे,शिरीष गांगुर्डे,जावेद शेख,रवी पगारे,भरत कर्डक शादब शेख,रफिक टकारी,अबिद शेख,अल्लाउद्दिन अन्सारी,हरून टकारी,शरद सोनवणे,रमेश पाईकराव,देविदास पवार,रवी समदुर,सुनीता कर्डक,निर्मला सोनवणे,संगीता वाघ, आदी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महिला पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार