July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आज सर्वांना गरज़ बुद्धांची

आज देशात महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे. नवजवान तरुण गुन्हेगारी कडे आकर्षित होत आहेत. ज्या वयात मुले आपल्या भविष्याचे स्वप्नं बघतात त्या वयात मुले गुन्हेगार बनत आहेत. पण ते विसरत आहे की या कारणाने समाजात दहशत आणि दुःख वाढत आहे.

आपन स्वताच आयुष्य दुःखात ढकलतो आहे त्याच वेळेस लोकांचे आयुष्य दुःखात ढकलतो आहे. आपण एक दुःखी समाज बनवत आहे हे त्यांना समजत नाही आहे. आज स्री मुक्त पणे जगू शकत नाही. प्रत्येक आई वडील चिंतेत जगत आहे. कुठे तरी ही समाज विरोधी, माणुसकी विरोधी, मानसिकता संपवायला हवी. जर हा समाज सुखी नसेल तर या समाजात कोणीही सुखात जगू शकत नाही. हे आयुष्य खूप चोट आहे कधी चालू झाले आणि कधी संपेल सांगता येत नाही. मग आपन हा दुःखी समाज का निर्माण करतो आहे. या जगात सर्वानी सुखात जगावं हेच जगन आहे नाहीतर आपल्याला मध्ये आणि प्राण्यांन काय फरक असेल. जेवढे पण आयुष्य लोकांना मिळाले आहे ते सुखात जगावे.

आज खरच प्रत्येकाला गरज़ आहे बुद्धाची आणि त्यांचा तत्त्वज्ञानाची. बुद्ध नी दुःख मुक्तीचा मार्ग दाखवला आहे. त्याच मार्गाने जाऊन आपण आणि हा समाज हा देश दुःख मुक्त करू शकतो. बुद्ध नी विपश्यना शोधली त्याच विपश्यने कडे जग आकर्षित होत आहे आणि दुःख मुक्ती कडे वाटचाल करत आहेत. बाहेर देशातून लोक विपश्यना करायला येतात. का तर सुख शांती मिळावी. आज त्याच विपश्यने समाजाला गरज़ आहे. जर समाज इथले लोक जर विपश्यना करायला लागले तर हा देश सुखी व्हायला वेळ लागणार नाही. आज प्रत्येक जेल मध्ये विपश्यना शिकवली गेली पाहिजे. प्रत्येक बाल गुन्हेगाराला विपश्यना चा मार्ग दाखवायला हवा. विपश्यना ही सक्तीची करायला हवी. जर ह्या समाजातून गुन्हेगारी प्रवृत्ती संपवायची असेल तर विपश्यने चा मर्ग स्विकारायला हवा. आज प्रत्येक शहरात प्रत्येक गावात विपश्यना सेंटर तयार व्हायला हवेत. बुद्धाचे तत्त्वज्ञान लोकांन पर्यंत पोहोचायला हवेत. विपश्यना प्रत्येक घरात पोहोचायला हवेत. प्रत्येक गुन्हेगाराला विपश्यने मार्ग दाखवला पाहिजे जेणे करून ह्या देशातून ह्या समाजातून गुन्हेगारी संपून जाईल. जर विपश्यना आणि बुद्ध यांचा तत्त्वज्ञान समाजामध्ये पसरवले तर हा समाज नक्किच सुखी आणि समृद्ध समाज बनेल. हा देश हा समाज गुन्हेगारी प्रवृत्ती चा नायनाट होईल.
आज सर्वांना गरज़ आहे बुद्धाची कारण सुखा पेक्षा या जगात मौल्यवान काहीच नाही. गुन्हेगार असो की सामन्य माणूस प्रत्येकाला गरज़ आहे शांतीची. खरच आज गरज़ आहे बुद्धाची 🙏🙏🙏
राज गांगुर्डे
9527065006