आज समाजामध्ये फिरताना अस प्रकर्षाने जाणवत की समाजामध्ये आंबेडकरवादी कमी आणि अम्बेडकरभक्त जास्त दिसतात. भक्त हे समाजाला घातक असतात.
आंबेडकरवादी आणि आंबेडकरभक्त या मध्ये खूप फरक आहे.
गाडीला खूप मोठा निळा झेंडा, मोठ्या आवाजात गाणे, तोंडात गुटखा, दारू पिऊन Dj वर नाचणे, कुठलतरी व्यसन असणे, असभ्य वर्तन, असभ्य भाषा हे सर्व अम्बेडकरभक्त असल्याचे लक्षण आहे. अशा लोकांनी स्वतःला आंबेडकरवादी म्हणू नये.
घर पुस्तकाने भरलेले , घरामध्ये संविधान, उच्च शिक्षण, उच्च विचार, उच्च रहाणीमान, माणुसकी, गोर गरीब लोकांना मदत करणे, चांगल्या विचारांची देवाणघेवाण करणे, लहान मुलांना चांगले आचार विचार शिकवणे, त्यांना शिक्षणच महत्त्व सांगणे, शिक्षण हे सर्वस्वी आहे हे समजावणे, पुतळे उभारण्यापेक्षा ग्रंथालय बनवणे, सर्व जाती धर्मा चा सन्मान करणे, विचाराने लढाई लढणे, सर्व जाती धर्माच्या गरीब मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज आणि देश घडविणे म्हणजेच आंबेडकरवादी..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवशी भव्य पुस्तक प्रदर्शन भरवावे, गोर गरिब लोकांना सामजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी काय करता येईल यासाठी सभा चर्चा भरवल्या जाव्यात. गोर गरीब लोक ज्यांना एक वेळचे जेवण मिळत नाही अशा लोकांना अन्न कसे मिळेल यावर चर्चा झाली पाहिजे. गोर गरीब लोकांचा मुलांना शिक्षण कसे भेटेल याची चर्चा व्हावी. लहान मुलांच्या भीक मागणार्या हातात शिक्षण कसे भेटेल याचा सभा, चर्चा व्हाव्यात.
आज शहरामध्ये लहान मुले भीक मागताना दिसतात, तरुण मुले गुंडगिरी कडे वळताना दिसतात. आदिवासी भागात मुला मुलींना शिक्षण मिळत नाही. काही मुलांना गरिबीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागते. झोपडपट्टीतील अवस्था खूप वेदनादायक आहे. भररस्त्यात तरुण मुली आपल्या छोट्या मुलांना घेऊन भीक मागताना दिसतात. हे सर्व मनाला विछिन्न करणार आहे. जर आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वप्नातील समाज, देश घडवायचा असेल तर आंबेडकरवादी लोकांना हे सर्व बदलण्याचा प्रयत्न करावा लागेल.
आज देशभरामध्ये विविध आंबेडकरी संघटना आहे. प्रत्येक शहरात, गावा खेड्यात आंबेडकर मित्र मंडळ आहे. असंख्य आंबेडकरी कार्यकर्ते आहेत. भीम जयंती साजरी करण्यासाठी खूप पैसा जमा होतो. जर हा पैसा गोर गरीब लोकांचा कल्याणासाठी, गोर गरीब मुलांचा शिक्षणासाठी, शहरातील भीक मागणार्या लोकांचा कल्याणासाठी, गोर गरीब मुलांचे भविष्य घडविण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशनासाठी, हा पैसा खर्च करावा जेणेकरून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज आणि देश घडवूया. येणार्या काळात आंबेडकर संघटना ह्यांची ओळख ही सामजिक संघटना, लोक कल्याण संघटना अशी व्हावी. समाजातील प्रत्येक माणसाची ओळख ही आंबेडकरी विचारवंत अशी व्हायला हवी.
जर आपण हे सर्व करू शकलो तर खऱ्या अर्थाने ह्या देशाचा मातीत बुद्धांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे बीज ह्या मातीत रुजवली जातील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर मानवतेसाठी लढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य आपल्या मानवता शिकवते.
मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीसुद्धा मानवतेसाठी साजरी व्हायला हवी
जय भीम
राज गांगुर्डे
9527065006
More Stories
“मुंबई महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे ?” – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतीय लोकशाहीची मूल्ये आणि बुद्ध विचार – अतुल भोसेकर
नालंदा – बोधिसत्वांची मांदियाळी : अतुल मुरलीधर भोसेकर