अमिताभ हे नाव अमित+आभा या शब्दापासून तयार झालेले आहे.
अमित म्हणजेच अनंत किंवा अमर्यादित
आभा म्हणजे तेज किंवा प्रकाश. अमिताभ बुद्ध म्हणजेच अनंत प्रकाशाने संपन्न असलेले बुद्ध…
अमिताभ सुत्रामध्ये अमिताभ बुद्ध यांची कथा पुढीलप्रमाणे सांगण्यात आली आहे.
धर्मकाया बोधिसत्व हे एका प्रदेशाचे चक्रवर्ती सम्राट आहेत. काही काळानंतर त्यांच्यात वैराग्य निर्माण होऊन ते प्रवजीत होतात. धर्मकाया बोधिसत्व हे असंख्य कल्पांपासुन पुण्यधर्माचा व अनेक परिमितांचा संचय करत असतात. ते प्रयत्न करून कधीपण बुद्ध होऊ शकतात, पण अनंत सत्वांचे व प्राणी मात्रांचे परिपूर्ण कल्याण केल्याशिवाय बुद्धत्वाचा लाभ करणे म्हणजे कदाचित स्वार्थीपणाचे लक्षण असु शकते त्यामुळे ते संकल्प करतात की जोपर्यंत संसारातील समस्त प्राण्याचे कल्याण करत नाही तोपर्यंत विमुक्ती सुखाचा लाभ घेणार नाही. जर माझ्या कडुन प्राण्यांचे कल्याण झाले नाही तर मी बुद्धच होणार नाही अशी प्रतिज्ञा करुन नंतर ते अनंत परिश्रम करुन सम्यक संबुद्ध होतात.
अमिताभ बुद्ध हे महायान पंथातील एका लोकप्रिय बुद्धाचे नाव आहे. सुखावती-व्यूह या प्राचीन बौद्धसूत्रात अमिताभ बुद्धाला सुखावती (Ultimate Bliss) नावाच्या स्वर्गाच्या पश्चिम दिशेचा मालक म्हटले आहे. महायानी परंपरानुसार मोक्षप्राप्तीच्या प्रयत्नात या बुद्धाला फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. ज्या लोकांना समाधिच्या अवस्था मिळाल्या नसतील त्यांनी फक्त ह्या बुद्धावर श्रद्धा ठेवल्यास, ह्या बुद्धाला नमन केल्यास किंवा त्यांचे नामस्मरण केले तरी साधकाला आपल्या पापां पासून मुक्तात मिळते व स्वर्गात स्थान मिळते असा समज दृढ झाला आहे.
अमिताभ बुद्ध हा सिद्धार्थ गौतम बुद्धाप्रमाणे ऐतिहासिक व्यक्ती नसून तर सनातन धर्माच्या संकल्पनेने प्रभावित दैवी व्यक्तीमत्व असल्याची शंका येते. चीन व जपान मधील अनेक बुद्ध मूर्ती या अमिताभ बुद्ध यांच्याच आहेत असे अभ्यासकांचे मत आहे.
अमिताभ बुद्धाचे व्हियेतनाम, चीन व जपान या देशांत फार महत्त्व आहे.
You are in Dhamma
✍️ राहुल खरे नाशिक
9960999363
More Stories
🧡 बुद्धांचे मैत्रीविषयक विचार 🧡 Buddha’s Thoughts On Friendship
🐍 Nag Panchami and Buddha Dhamma – A Buddhist Perspective 🐍 नाग पंचमी : परंपरेतून समजून घेणे
Buddhist Story अंगुलिमाल – खुनी भिक्षू बनतो!