भंते नंद हा प्रजापति गौतमी व शृध्दोधन यांचा मुलगा, बहीण रुपनंदा. नंद हे तथागत बुद्धाचे मावसभाऊ व सावत्रभाऊ सुद्धा आहेत. भगवान बुद्ध हे नंदचा मंगल परिणय सोहळा संपन्न झाल्यावर कपिलवस्तु येथून निघत असताना नंद त्यांचे चिवर व पात्र घेऊन त्यांच्या मागे मागे चालत होते. तथागताने त्यास विचारले की,
“नंद प्रवजीत होऊ ईच्छितोस काय?”
सिद्धार्थ गौतम बुद्ध हे नंदचे मोठे भाऊ आहेत. नंद हे तथागत बुद्धाचा प्रचंड आदर करायचे. तथागता विषयी प्रचंड प्रेम व आदर असलेले नंद त्यांना नाही म्हणु शकले नाही. त्यामुळे मनात नसताना, ईच्छा नसताना नंद तथागतास हो म्हणतात. व लग्नाच्या दिवशी सायंकाळी प्रवजीत होतात. नंद यांची नववधु जनपदकल्याणी अत्यंत सुंदर होती. नंद तीच्या सौंदर्यावर लुब्ध झाले होते. त्यामुळे नंद प्रव्रजीत असुनही आपल्या पत्नी विषयी सतत चिंतीत असायचे व अंत्यत दुःखी होऊन दुविधा मनस्थितीत राहुन संघात विहार करायचे. या गोष्टीचा माहिती तथागत बुद्ध पर्यंत गेली, त्यामुळे भंगवंन बुद्धानी नंदची सौंदर्या विषयी आसक्ती नष्ट करण्यासाठी नंदला तावंतिस दिव्यलोकातील अतिशय सुंदर स्रीयांचे दर्शन घडवले, व सांगीतले की, नंद विनयाच्या नियमांचे पालन करुन धम्मानुसार आचरण केल्यास त्या सर्व स्त्रीया तुला मिळतील, असे नंदला भगवान बुद्धाने वचन दिले.त्यामुळे नंद विनयाचे नियम काटेकोरपणे पाळुन धम्मानुसार आचरण करायला लागले. पण नंद हे स्वार्थीसाठी व सुंदर स्त्रीयांसाठी विनय धम्माचे पालन करतात, असे ईतर भिक्षुंना समजले. त्यामुळे नंद यांची सर्वत्र निंदा व्हायला लागली. यामुळे नंद एकटे राहुन तथागताच्या उपदेशानुसार जीवन व्यतीत करु लागले.
यानंतर नंदमधे वैराग्य उत्पन्न होऊन मोठ्या परिश्रमाने नंद अरहंत पदास प्राप्त झाले. नंतर भंते नंद कसं वागु लागले याचे वर्णन अंगुत्तर निकायच्या अट्ठकनिपापात आहे. इंद्रियांचे रक्षण करणारा, भोजनाचे प्रमाण जाणनारा, स्मृतीसंप्रजन्याने युक्त असा नंद आहे. नंद ज्या दिशेला पाहतो त्या दिशेला आपल्या मनात वाईट विचार व लोभ निर्माण होउ नये याच निश्चयाने पाहतो, या शरीराचे पालन व्हावे, भुकेच्या वेदना नष्ट व्हाव्या, जास्त खाल्याने नविन वेदना उत्पन्न होणार नाही, शरीराची यात्रा सुखावह होईल, मनाला सुख मिळेल व मी दोषी ठरणार नाही असा विचार करुन नंद अन्न ग्रहण करतो.
तथागत म्हणतात, “भिक्षुंहो नंद दिवसभर चंक्रमन करून व बसुन चित्ताचा आळस घालवतो. रात्रीच्या प्रथम प्रहरी(संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेची वेळ) सावधपणे सिंहासारखा निजतो व अंतिम प्रहरी चंक्रमन करून व बसुन चित्ताचा आळस घालवतो. अशा रितीने तो अल्प निद्रा घेत असतो. नंदाला ज्या ज्या वेदना उत्पन्न होतात त्या त्या माहित असतात, जे जे वितर्क व विचार मनात निर्माण होतात ते ते नंदला माहित असतात अशा रितीने तो स्मृतीसंप्रजन्य युक्त राहतो.”
स्थवीर नंद हे बौद्ध ईतिहासातील प्रभावी लोकांपैकी एक आदर्श व्यक्तीमत्व आहे.
अनेक शिल्पांमधे नंद यांना भगवंताचे चिवर व भिक्षापात्र घेउन चालत असल्याचे दाखवले जाते. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की, इंद्रियांचे रक्षण करणार्या भिक्षुं श्रावकांमधे नंद श्रेष्ठ आहे.
You are in Dhamma
✍️ राहुल खरे नाशिक
9960999363
More Stories
🧡 बुद्धांचे मैत्रीविषयक विचार 🧡 Buddha’s Thoughts On Friendship
🐍 Nag Panchami and Buddha Dhamma – A Buddhist Perspective 🐍 नाग पंचमी : परंपरेतून समजून घेणे
Buddhist Story अंगुलिमाल – खुनी भिक्षू बनतो!