आजपासून चोरी व सुज्ञ लोक दोष देतील असे कुठलेही वाईट कर्म करणार नाही.
खजुत्तरा ही उपासिका घोसित श्रेष्ठीच्या उत्तरा नामक दासीच्या पोटी जन्माला आली होती. खजुत्तरा हीच्या पाठीवर थोडेसे कुबड आलेले होते. ती भगवान बुद्धाची शिलससंपन्न श्रद्धावान उपासिका होती. खजुत्तरा ही कौशांबीचा राजा उदयनची पटराणी सामावतीची दासी होती. खजुत्तरा राजमहलातील विविध कामासाठी फुले व पुष्पहार आणून देत असे. एके दिवशी तथागताला कौशांबी नगरातील प्रमुख माळयाच्या घरी भोजनासाठी आमंत्रण होते. खजुत्तरा ही रोज नित्य नियमाने याच माळ्याच्या घरी फुले घेण्यासाठी येत असे. आज खजुत्तरा फुले आणण्यासाठी घरी आली असता माळी तीला म्हणाला,
“अग खजुत्तरा तुला फुले व पुष्पहार देण्यासाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये, मला तथागत बुद्ध व भिक्षुंसंघ स्वागतासाठी फुले व पुष्पहार बनवायची आहेत. कृपया हे सगळं बनविण्यासाठी तु पण मला मदत कर.”
दासी खजुत्तरास सांगितल्या
प्रमाणे तीने फुले व पुष्पहार बनविण्यासाठी मदत केली. तथागताचे भोजन झाल्यावर तथागतानी सर्वांना उपदेश दिला. तो उपदेश दासी खजुत्तरानेही ऐकला. व तीच्या मनांत भगवान बुद्धाविषयी असीम श्रद्धा उत्पन्न झाली. व तीने याअगोदर केलेल्या कृत्याचा तीला पश्चात्ताप झाला व तीला स्वतः ची लाज वाटायला लागली. बुद्ध उपदेशावर गंभीर चिंतन करत करतच खजुत्तरा फुले घेऊन सामावतीकडे गेली. सामावतीला आज नेहमी पेक्षा जास्त फुले आणलेली दिसली. त्यामुळे सामावती खजुत्तराला म्हणाली,
“आज नेहमी पेक्षा जरा जास्त फुले आणली आहेस, आज राजाने प्रसन्न होऊन तुला फुले खरेदीसाठी जास्त पैसे दिले होते की काय ?”
खजुत्तरा म्हणाली,
“मला रोज फुले खरेदी साठी रोज आठ कार्षापण मिळत होते, पण त्यापैकी मी चार कार्षापणाची फुले आणत असे व चार कार्षापणाची दररोज चोरी करत असे. पण आज मी संपुर्ण आठ कार्षापणाची फुले आणली आहेत ”
हे ऐकुन सामावती आश्चर्यचकित झाली व म्हणाली
“अग मग आजच का तु आठ कार्षापणांची फुले आणलीस. आजही चार कार्षापण ठेवून घेतली असतीस. आजच असे का केले तु ?”
खजुत्तरा म्हणाली,
“आज मी तथागताचा आमृतप्राय धम्मोपदेश श्रवण केला आहे व त्यातील गंभीर सत्य व तथ्य जाणूनी मला सद धम्माचा साक्षात्कार झाला आहे. आजपासून माझ्या कडुन चोरी व लोक दोष देतील असे कुठलेही वाईट कर्म होणे शक्यच नाही.”
सामावती विनोद करत म्हणाली,
“अग खजुत्तरे तु जो तथागताचा सद्धम्म जाणलास, तो थोडासा आम्हालाही दे.”
असे म्हणत सामावती व तिच्या सर्व मैत्रिणींनी प्रसाद जसा हतावर घेतात त्याप्रमाणे खजुत्तरा समोर हात पुढे केले. पण खजुत्तरा गंभीरपणे म्हणाली
“मी जाणलेला भगवान बुद्धाचा सद्धम्म हातावर ठेवता येत नाही व हातावर देताही येत नाही, हातावर द्यायला हा काही प्रसाद नाही. हा धम्म फक्त स्वानुभवाने व स्वप्रयत्नानेच जाणुन घेता येतो, मी त्या धम्माचा तुम्हाला उपदेश करते, जर तुमच्या कर्मात असेल तरच तुम्हाला त्या धम्माचा लाभ होईल.”
असे म्हणुन खजुत्तराने तथागताचा उपदेश राणी सामावती व तीच्या पाचशे मैत्रीनींना सांगितला. तो उपदेश सामावती व तिच्या सर्व मैत्रिणींना ईतका आवडला की, त्या सर्व खजुत्तरेस बुद्धाचा नवनविन उपदेश ऐकण्यासाठी पाठवत असत व तिच्या कडुन तो उपदेश ऐकून घेत असत. त्यामुळे त्यां सर्वांना सद्धम्माचा लाभ झाला. खजुत्तरा नेहमी भगवान बुद्धाचा उपदेश ऐकुन सर्वांना सांगत असे त्यामुळे त्या सर्व राजपरिवारातील स्रीया खजुत्तरास गुरुस्थानी मानत असे. अशाप्रकारे खजुत्तरा तथागताचा धम्म प्रसार व प्रचार करत होती. तथागताचे उपदेश ऐकुन खजुत्तरा ईतरांना ही सांगत होती त्यामुळे तथागत म्हणतात,
बहुश्रुत उपासिकात खजुत्तराच श्रेष्ठ आहे.
You are in Dhamma
✍️ राहुल खरे नाशिक
9950999363
More Stories
🧡 बुद्धांचे मैत्रीविषयक विचार 🧡 Buddha’s Thoughts On Friendship
🐍 Nag Panchami and Buddha Dhamma – A Buddhist Perspective 🐍 नाग पंचमी : परंपरेतून समजून घेणे
Buddhist Story अंगुलिमाल – खुनी भिक्षू बनतो!