पुणे : परभणी येथील आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा दिनांक 11 डिसेंबर रोजी झालेल्या पोलीस मारहाणीत मृत्यू झालेला आहे. सदर बाबतची पुष्टी आज शिवविच्छेदन अहवालात करण्यात आलेली आहे, त्यामुळे सदर प्रकरणी आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सूर्यवंशी यांना मारहाण करणारे पोलीस निरीक्षक , कर्मचारी यांच्यासह यात सहभागी असलेले पोलीस अधीक्षक परभणी यांच्यावर देखील खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित केलेल्या निदर्शनाच्या आंदोलनाद्वारे केली. तसेच या प्रकरणी सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयास एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई व कुटुंबातील एक सदस्य शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी देखील करण्यात आली.
” आंबेडकरी आंदोलकांबाबत पोलीस प्रशासन व सरकार भेदभाव पूर्ण वागत असल्याचे हे उदाहरण असून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणे व दलित कार्यकर्त्यांना मरेपर्यंत मारणे ही शासनाची नीती समोर आलेली आहे. ” अशी भुमिकाही यावेळी डंबाळे यांनी मांडली.
दरम्यान परभणी येथे आंबेडकरी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्वच गुन्हे मागे घेण्यात येऊन सर्व आंदोलकांची मुक्तता करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
सदर आंदोलनामध्ये राहुल डंबाळे , बाप्पुसाहेब भोसले, सुवर्णा डंबाळे , अशोक जगताप , संगिताताई आठवले , रविंद्र क्षीरसागर, सत्यवान गायकवाड , विठ्ठल गायकवाड, अनिताताई धिमधिमे , स्नेहाताई माने , सुजाताताई सोनकांबळे , इलियाज शेख , प्रतिक डंबाळे , आनंद कांबळे, फिरोज मुल्ला , रिपब्लिकन युवा मोर्चा सह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दलित पॅंथर यासह विविध पक्ष संघटनातील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
More Stories
Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा संपन्न झाला
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.