July 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आम्ही भारताचे लोक (आयोजक) तर्फे राज्यस्तरीय संविधान जागर परिषद

पुणे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे आम्ही भारताचे लोक (आयोजक) तर्फे राज्यस्तरीय संविधान जागर परिषद (वर्षे ४ ते ) आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून संविधान अभ्यासक नूर खान पठाण सर होते, सुरुवातीला अतिथी पाहुणे, धर्मगुरू यांचें मार्गदर्शन झाले, नंतर नूर खान पठाण सर यांचें सखोल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन झाले.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संदिप थोरात सर व नूरखान पठाण सर हे आम्हाला नेहमीच विशेष सन्मान देतात, मार्गदर्शक म्हणून उल्लेख करतात हा त्यांचा मनाचा मोठेपणा, दिलदार पणा आहे, दोघांचं आणि त्यांच्या टीमचे कार्य अभिनंदनीय व अनुकरणीय आहे.
खास आपल्यासाठी या कार्यक्रमाचे क्षणचित्रे, यामध्ये नूर खान पठाण सर, संदिप थोरात सर, दिंगबर कदम सर, रंजना ताई कांबळे, आम्ही अशोक तुळशीराम भवरे, धर्म गुरु व इतर मान्यवर दिसून येत आहेत.
अशोक तुळशीराम भवरे
संविधान प्रचारक/प्रसारक, नांदेड.