June 19, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

(लेण्याद्री) प्राचिन बौध्द लेणी आणि अंबा -अंबिका प्राचिन लेणी व भूत लेणी जून्नर

 दि. 04.11.2021 रोजी सारनाथ बौध्द विहार, चंदननगर-खराडी, पुणे येथील उपासक, उपासिका व तरुण, तरुणी यांचेबरोबर कपिचीत (लेण्याद्री) प्राचिन बौध्द लेणी आणि अंबा-अंबिका प्राचिन लेणी व भूत लेणी जून्नर, पुणे येथे दिवाळीच्या लक्ष्मीपुजनाच्या सुट्टी निमित्त जाणे झाले. तसे पाहिले तर मी अनेक वेळा या भागातील प्राचिन बौध्द लेण्यांस भेट दिली आहे परंतू या वेळेसचा माझा अनुभव एकदम वेगळा होता.

सर्व धम्म बांधव व त्यांचे कुटुंबीय अतिशय उत्साहामध्ये होते. धम्म ऐकण्यास, जाणून घेण्यास, नवे शिकण्यास त्यांनी एकदम उत्तम प्रतिसाद दिला. अनेक वेळा या लेण्यास जावून सुध्दा या वेळी मनाची परिस्थिती फार अस्वस्थ होती. या प्राचिन बौध्द लेण्यांचा प्राचिन इतिहास हा खरा असूनही या लेण्यांस अनऐतिहासीक खोटी नावे दिलेली आहे. जसे कपिचीत लेणीस लेण्याद्री, तसेच खोरे भागास असलेली अंबा-अंबिका, भिमाशंकर लेणी व भूत लेणी व शिवनेरीच्या पाठिमागे असलेली तुळजा लेणी. लेणी. सातवाहन काळामध्ये अखंड पाषाणामध्ये कोरलेल्या या बौध्द लेण्या त्यावेळेसच्या समाजमनाने अत्यंत उदारपणे तथागतांच्या धम्मास स्विकारुन या लेण्यांची निर्मिती केली आहे. परंतू भारतातील जातीयवाद, धर्मवाद, वंशवाद, अंधश्रध्दा, वितंडवाद व वंशश्रेष्ठत्वाच्या असुरी भावनेने या लेण्यांची हेळसांड झाली आहे.

खोरे भागातील अंबा-अंबिका लेणीच्या पुढे असलेली बुध्द लेणीस तर भुताची उपमा दिली आहे की, जनतेच्या मनात भिती, तुच्छता निर्माण व्हावी. भूत लेणीवर तर अप्रतिम कोरीव काम करण्यात आले आहे. सिध्दार्थ गौतम माता राणी महामाया चे चित्र या लेणीवर कोरलेले आहे की ज्यांना महालक्ष्मी संबोधण्यात येते. आज लक्ष्मीपुजनाचे दिवशी राणी महामया यांचे दर्शन घेवून आंम्ही कृतज्ञ झालो. अंबा, अंबिका, भिमाशंकर, तुळजा या अनएैतिहासीक काल्पनीक पात्रांची या लेण्यास नावे दिली आहे या काल्पनीक पात्रांचा व या लेण्यांचा अर्थाअर्थी काहीही दूरवरचाही संबंध नाही व या कार्यास दुजोरा शासकीय पातळीवर पुरातत्व खाते, राजकारणी, अंधश्रध्दाळू जनता, इतिहासकार, तथाकथीत धम्मधुरिण लेखकांनी दिला आहे. लवकरच या लेण्या बुध्द सर्किट या महत्वाकांक्षी योजनेमध्ये येणार आहे. या वेळेस या लेण्याचा विकास होईल अशी आशा धरु या. तरी या लेण्यांची नावे बदलून इतिहासकारांनी धम्म धुरिणांनी नवी धम्मास अनुसरुन नावे या लेण्यास देण्यासाठी पाठपुरावा करावा असे वाटते.