February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव मिळालेच पाहिजे- नाशिक विमानतळ नामांतर कृती समिती

पुणे _ नाशिक विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव मिळालेच पाहिजे या मागणीसाठी आंदोलन उभे करण्यास नाशिक येथे 4 जुलै रोजी आयोजित बैठकीत उपस्थित रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुढील रुपरेषा ठरविताना आलेल्या सुचना मधुन सर्वानुमते ठराव पास केले. पैकी ठरल्या प्रमाणे जिल्हास्तरीय बैठकींचे आयोजन करण्यास अनेकांनी आपापल्या जिल्हा, तालुक्यातील बैठकीची जबाबदारी स्वीकारली आणि

पहिली प्रादेशिक बैठक रविवार दि. १८ जुलै २०२१ रोजी पुणे येथील अल्पबचत भवन, क्वीन्स गार्डन, शासकीय विश्रामगृहामागे संपन्न झाली या बैठकीच्या आयोजनाची जबाबदारी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी स्विकारली तद्वत त्यांनी, ती अगदी शिस्तबद्धरित्या पार पाडली.
सदर बैठकीस रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील तसेच ईतर अनेक पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. सदर बैठक रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते तानसेनभाई नन्नावरे यांच्या मार्गदर्शनात व मा.आमदार जयदेव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पॅन्थर नेते नानासाहेब भालेराव, दलित कोब्रा अध्यक्ष ॲड.भाई विवेक चव्हाण, भिम छावा अध्यक्ष शाम गायकवाड, माजी उप महापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे, आरपीआय नेते दयाल बहादुरे, मा. नगरसेविका लताताई राजगुरु, रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे महा.प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, रिपब्लिकन जनशक्तीचे शैलेंद्र मोरे, रिपाई पुणे संघटक संग्राम रोहम, रिपाई उत्तर महा. प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ काळे, युरिप प्रदेश सरचिटणिस आनंद निरभवणे, पँथर नेते राजेंद्र जाधव, वंचितचे पुणे शहराध्यक्ष मुनवर कुरेशी, रिपाई महा.प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड, रिपाई पणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, राष्ट्रीय दलित पँथर महा.प्रदेश कार्याध्यक्ष यशवंत नडगम, राष्ट्रीय दलित पँथर पुणे शहराध्यक्ष प्रकाश साळवे, भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष विजयभाऊ डोळस, दादासाहेब गायकवाड यांचे नातु राजेंद्र गायकवाड,रिपब्लिकन युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अश्विन दोडके, भिमलहुजी महासंग्राम सा.वि.संघटनेचे विनोद वैरागर, आॅल इंडिया ब्लू टायगर चे नेते विलास रुपवते, बाळराजे शेळके, मंगेश पगारे, दुबे, आझाद समाज पार्टीचे पुणे शहराध्यक्ष अभिजीत गायकवाड, अन्याय अत्याचार विरोधी कृती समिती मुंबईच्या मधु शिवलकर, राष्ट्रीय दलित पँथर चे भाऊराव साळवे,सिकंदर वाघ,संतोष वाघ, ना. वि. कृती समिती संयोजक नविन नन्नावरे, आरक्षण बचाव मुव्हमेंटचे दादासाहेब यादव,आरक्षण बचाव मुव्हमेंटचे जीवन भालेराव यांच्या उपस्थितीत स्थानिक नेते कार्यकर्त्यांनी सुचना करत तसेच जबाबदारी स्विकारत ९ आॅगस्ट २०२१ रोजी नाशिक जिल्हा कचेरीवर धडकणाऱ्या महामोर्चास पुण्यातील शेकडो कार्यकर्त्यांना घेवुन उपस्थित राहणार असल्याचे आवाहन केले. तसेच उपस्थितांचे दादासाहेब गायकवाड यांचे पणतु तथा कृती समितीचे संयोजक सागर गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले

जीवन भालेराव
7045654702

प्रसिध्दी व जनसंपर्क
नाशिक विमानतळ नामांतर कृती समिती ( राज्य ) यांच्या वतीने कळविण्यात आले