February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्धिस्ट सर्किट योजनेत जुन्नरच्या लेणीसमूहांचा समावेश करण्यासाठी केंद्राला लवकरच प्रस्ताव

 केंद्र सरकारच्या ‘बुद्धिस्ट सर्किट योजनेत जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, तुळजा, लेण्याद्री या लेणी समूहाचा समावेश करण्यासाठी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने पर्यटन संचालकांचा अभिप्राय मागविला आहे. 

जुन्नर शहरापासून काही अंतरावर शिवनेरी, तुळजा, सुलेमान, मानमोडी या गटात विभागलेल्या २२० लेण्यांचा समूह आहे.

सातवाहन साम्राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या जुन्नर शहराजवळ दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वाधिक बौद्ध लेण्या कोरल्या होत्या.

हा लेण्यांचा समूह आर्केलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (एएसआय) अखत्यारित आहे.

या लेण्यांच्या अभ्यासासाठी देश-विदेशातून अभ्यासक व पर्यटक येत असतात.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली होती मागणी : जुन्नर लेणी समूहाचा विकास केल्यास बौद्ध संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी व परदेशी पर्यटकांसाठी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र आणि पर्यटनस्थळ होऊ शकते, या भूमिकेतून या लेणी समूहाचा केंद्र सरकारच्या ‘बुद्धिस्ट सर्किट योजनेत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती.

दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे.

पर्यटन संचालकांचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारकडे रीतसर प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.