November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

विद्यार्थी, पदवीधर युवक, बेरोजगार आणि  वंचितांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य- रतन बनसोडे

नाशिक । प्रतिनिधी : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून रतन बनसोडे यांना उमेदवारी जाहीर
नाशिक विधानसभा पदवीधर मतदारसंघाच्या होणा-या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून रतन बनसोडे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत या निवडणुका होण्याची शक्यता आहे. श्री रतन बनसोडे यांनी मंत्रालयात समाजकल्याण विभागातील नगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण विभागात अधिकारीपदावर काम केले आहे. या शिवाय त्यांनी अहमदनगर, नाशिक, पुणे, ठाणे या जिल्ह्यात समाजकल्याण विभाग समाजकल्याण अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच मुंबईत विभागीय जात पडताळणी समितीमध्ये श्री रतन बनसोडे यांनी उपायुक्त पदावर काम केले आहे आणि समाजकल्याण उपायुक्तपदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत.
नाशिकमध्ये असताना तळागाळातील आणि वंचित गोरगरीब लोकांच्या विकासासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. नाशिकमध्ये सरकारी सेवेत असताना रतन बनसोडे यांनी स्मशानात काम करणा-या महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. श्री रतन बनसोडे यांनी तळागाळातील वंचित नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सरकारी योजनांची अंमलबजावणी केली. तसेच या योजना संबंधित उपेक्षीत लोकांपर्यंत कशा योग्य प्रकारे पोहचतील त्यांचा या वंचित घटकांना कसा लाभ होईल, या दृष्टीकोनातून मोलाचे काम केले आहे. श्री रतन बनसोडे यांचे संपूर्ण जीवन हे  त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करून घडवलेले आहे. शिक्षण, रोजगार आणि लोकसेवेसाठी त्यांनी सरकारी नोकरी पत्करली होती. त्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुण-तरुणी आणि वंचित लोकांचे जीवन घडवले आहे. त्यांच्या निर्मळ निखळ व्यक्तीमत्वामुळे लोकांचे आवडते झाले आहेत. आजही सेवानिवृत्तीनंतर श्री रतन बनसोडे हे समाजसेवेत, लोकसेवेत वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहेत. वंचित बहुजन आघाडीने एका उच्च शिक्षीत आणि जनतेशी तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारे आणि जनतेच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी काम करणा-या रतन बनसोडे यांना नाशिक विधानसभा मतदार संघातून संधी दिल्याने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.

Priority to solve problems of students, graduate youth, unemployed and underprivileged- Ratan Bansode