July 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

एकेकाळी अफगाणिस्तान हा देश संपूर्ण बौद्ध होता

बौद्ध धर्म हा वास्तववादी धर्म आहे. नुसत्या काल्पनिक गोष्टींवर बुद्धांनी आपल्या धर्माची उभारणी केली नाही. त्याचमुळे ईश्वर आणि आत्मा किंवा अशाच भलभलत्या गोष्टी बुध्दांना मान्य नव्हत्या. जे मानवाला अनुभवता येत नाही किंवा ज्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही, अशा कोणत्याही गोष्टींवर बुद्धांचा विश्वास नव्हता. प्रत्येक धर्माला दोन बाजू असतात. एक विचारावर आधारलेली तात्विक आणि दुसरी नीती नियम.
प्रत्येकाला धर्माची परीक्षा करून त्याची तपासणी करता आली पाहिजे. बाजारात सराफाच्या दुकानी आपण सोन्याचा दागिना खरेदीसाठी जातो. तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही हे पाहता की, हे सोने खरे आहे की खोटे? हे समजून घेण्यासाठी कसोटीवर त्या दागिन्याला कस लावून पाहण्यात येतो. तसेच धर्माला ‘कस’ लावून त्याची परीक्षा पाहिली पाहिजे. धर्म तत्वांची छाननी करून, सिद्धांत आणि आचार पडताळून आपण पाहू या की कोणता धर्म माणसाला सुख समाधान देऊ शकेल?
सोने कसोटीवर खरे उतरल्याशिवाय विकत घेत नाहीत तसेच धर्म देखील मानवाला उपयोगी आहे किंवा नाही या कसोटीवर घासून पारखून पाहिला पाहिजे. जोपर्यंत धर्माची अशी परीक्षा होत नाही तोपर्यंत तो स्वीकारणीय ठरणार नाही. म्हणून तुम्ही संपूर्ण विचाराअंती धर्माचा स्वीकार केला पाहिजे.
मी तुम्हाला सांगतो की, जगातील अखिल मानवाच्या कल्याणासाठी सदासर्वकाळ फक्त बौद्ध धर्मच राहील.”!!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड -१८, भाग-३, पान नं.४७८- ४७९)
दि. २३ जून १९५६, दिल्ली येथे बुद्धजयंती निमित्त बौद्धजन महासभा तर्फे आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.