मुदिता ही मनाची अवस्था आहे. जशी एकाग्रता ही शांत मनाची अवस्था आहे. तशीच मुदिता ही सुद्धा एक मनाची अवस्था आहे.
मानवी मन जेव्हा एखाद्या प्रसंगाने आनंदीत होते तेव्हा मानवाच्या चेहर्यावर नैसर्गिकरीत्या प्रसन्नता उमटते किंवा अवतरते अशा अवस्थेला मुदिता असे म्हणतात. अर्थात प्रसन्न चित्ताची अवस्था म्हणजे मुदिता होय.
भगवान बुद्धाला निर्वाण प्राप्ती नंतर कोणत्याही प्रकारची तृष्णा शिल्लक न राहिल्यामुळे त्यांचे मन सदैव प्रसन्न अवस्थेत राहत असे. सदैव आनंद त्यांच्या चेहर्यावर असे आणि म्हणून बुद्धाच्या या अशा तृष्णामुक्त अवस्थेतील प्रसन्न अवस्थेला मुदिता अवस्था असे म्हणतात.
बुद्धाची मुर्ती ही मूर्तीकार तयार करतांना त्यांच्या चेहर्यावर स्मित हास्य उमटवितो आणि त्या स्मित हास्यासह चेहर्याला मुदिता अवस्था असे म्हणतात.
आनंद आणि दुःख ह्या मानवी जीवनातील प्रमुख अवस्था आहेत. जेथे, ज्या क्षणी दुःख संपते तेथे प्राकृतीकच आनंद उत्पन्न होते आणि जेथे ज्या क्षणी आनंद संपतो तेथे तेथे दुःख उत्पन्न होते त्याचे कोणतेही कारण असू शकते पण सर्वसाधारणतः जेथे तृष्णा अति स्वरूपात निर्माण होते तेथे दुःख तर जेथे तृष्णा मुक्ती जीवन उत्पन्न होते तेथे आनंद निर्माण होत राहत असते.
सर्व साधारणतः मनुष्य हा कोत्या स्वभावाचा असतो, तो दुसर्याचे दुःख ,अडचणी पाहुन आनंदीत होतो तर दुसर्याचे सुख व आनंद पाहून स्वतः दुःखी होतो. अशी अवस्था म्हणजे अमुदिता अवस्था होय. तर, दुसर्यांचे दुःख पाहुन दुःख होणे आणि त्याच्या दुखाःत सहभागी होणे तसेच अशा अवस्थेत त्याचे दुःख दुर करण्यासाठी धडपड करणे आणि दुसर्यांच्या आनंदाने किंवा समृद्धी विकास पाहून आपणही आनंदीत होणे या अवस्थेला, मुदिता अवस्था असे म्हणतात. मैत्री भावा करीता मनाची मुदिता अवस्था आवश्यक असते.
तर,
उपेक्षा करणे एखाद्या गोष्टी पासून
उपेक्षित किंवा निरपेक्ष राहणे होय. अलिप्तता बाळगण्याच्या अवस्थेला सुद्धा उपेक्षा असे म्हणतात.
आवड ठेवणे किंवा नावड ठेवणे यातं गुंतुन पडण्यापेक्षा निरपेक्ष राहणे यास उपेक्षा असे म्हणतात. बरेचदा मनुष्य फलप्राप्तीने,यशाने आनंदीत, प्रफुल्लित न होणे किंवा अफलप्राप्तीने किंवा अपयशाने दुःखी न होणे या अवस्थेतला उपेक्षा असे म्हणतात.
अर्थात, दोन्ही यश अपयश परिस्थितीमध्ये
यत्किंचितही विचलित न होण्याच्या अवस्थेलाच उपेक्षा असे म्हणतात. ही अवस्था औदासीनता किंवा आळस या अवस्थेपेक्षा वेगळी आगळी अवस्था असून, जो पर्यंत मनुष्य तृष्णा मुक्तीच्या मार्गात राहत नाही तो पर्यंत अशी अवस्था प्राप्त होणे कठीण आहे. कारण ही अवस्था अलिप्तता, अनासक्ति,आवड आणि निवड सारख्या सर्व सामान्य अवस्थेपेक्षा वेगळे मनाची स्थिती होय.पाण्यातील कमळ स्थितीला उपेक्षा स्थिती असे म्हणतात.
निरपेक्षेतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजे उपेक्षा होय. म्हणजे च मानवी मनात सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारचा वाईट विचार येत राहत असतो तो स्वाभाविक मानवी अधर्म असतो,आणि अशा वाईट किंवा अधर्मिय विचारातुन मानवा कडून
वाईट कृती घडण्याची शक्यता अधिक असते त्याचे सामाजिक दुष्परिणाम प्रगटत राहत असतात. त्यातुन दुःखाशिवाय दुसरे तिसरे काहीच उत्पन्न होत नाही. असे होऊ नये म्हणून मनात निर्माण होत राहणारे वाईट, सामाजिक दृष्ट्या असभ्य वर्तन घडू नये म्हणून, अशा वाईट विचाराला तेथेच नष्ट करून, त्या ठिकाणी चांगले विचार उत्पन्न करीत राहून, सामाजिक सुखाचा विचार व वर्तन करण्याच्या प्रवृत्ती
स्थितीला उपेक्षा असे म्हणतात.
मानवी जीवनाला अर्थ प्राप्त करून देणे हे आपल्याच हातात आहे. शीलमार्गातील दाहा मार्ग जे भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत. त्यापैकी उपेक्षा आणि शांती हे दोन शीलमार्ग सांगितले आहे की,वाईट च्या उपेक्षा शिवाय चांगले उत्पन्न होत नाही आणि मनाच्या शांती शिवाय मुदिता किंवा प्रसन्नता मनात निर्माण होत नाही.
आप आपल्या कुवतीप्रमाणे जेथे जेथे शील सद्गुणाचे पालन होते अशा परिस्थितीत सुसंस्कृतीचा जन्म होत राहतो तर जेथे शील सद्गुणाचे पालन होत नाही तेथे विकृत संस्कृतीचा जन्म होत राहत असतो.
जगात बुद्ध धम्म/धर्म आणि त्यांचे एकमेव तत्वज्ञान, शिकवण ही अशी आहे की, तेथे सद्धम्म उत्पन्न होत राहून, सुसांस्कृतीक समाजाचा, संस्कृती चा जन्म होतो. चांगल्या राष्ट्राकरिता दसपारमिता किंवा दाहा शीलमार्ग सोबत अष्टांगिक मार्ग आवश्यक आहे.प्रत्येकाने अधिकत्तम अधिक, पंचशीलापासून याची सुरुवात केली,तर समाजाची मुदिता अवस्था निर्माण होण्यास मदत होते, उपेक्षा हा त्यापेकी एक मार्ग होय.
🌹
प्रा. मुकुंद दखणे
यवतमाळ 9373011954
जयभीम 🙏जयभारत
More Stories
१०० प्रेरणादायी बुद्धिस्ट सुविचार Buddh Quotes
🪷 तथागत भगवान बुद्ध, योग आणि विपश्यना : आत्मशुद्धीचा खरा मार्ग 🪷
बुद्ध धम्म (बौद्ध धर्म) हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे Buddha Dhamma (Buddhism) is the path to liberation from suffering.