पिंपरी : नाशिक ( ओझर ) येथील विमानतळास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आज पिंपरी येथे आंबेडकरी पक्ष संघटनांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे , कष्टकरी पंचायतीचे बाबा कांबळे , रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे भिमशाही संघटनेचे शिवशंकर उबाळे , बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध, पॅंथर सेनेचे अजय गायकवाड , महार वतन बचावाचे मिलिंद गायकवाड , नितीन कसबे, रामभाऊ ठोके , रिपाईचे अजीज शेख , रिक्षा संघटनेचे संतोष उबाळे , अश्विन दोडके , एम आय एम पक्षाच्या रुहीनाज शेख , माऊली बोराटे , रिपब्लिकन सेनेचे प्रमोद क्षीरसागर , शरद गायकवाड , दिनकर ओव्हाळ , प्रवीण जाधव , गणेश कांबळे , अमोल डंबाळे , अलेक्स कांबळे , आकाश जयस्वाल , संदीप साळवे , प्रदीप कांबळे , रुपेश ओव्हाळ , सोमनाथ मस्के , दिलीप देहाडे , बाळासाहेब जाधव , उत्तम गायकवाड, अरविंद तरकसे, मेघाताई आठवले , नवनाथ अडसूळ , सूर्यकांत जावळे, दिलीप कांबळे , अजिंक्य ठक्कर , प्रमोद शिंदे , बुद्धभूषण आहिरे, प्रसाद कांबळे , रोहन कांबळे, प्रतीक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर बैठकीचे सूत्रसंचालन अजय लोंढे यांनी केले तर आभार माऊली बोराटे यांनी मानले. प्रास्ताविक शिवशंकर उबाळे यांनी केले.
यावेळी नाशिक विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे यासाठी 9 ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट महामोर्चाचे आयोजन केले असून यात पिंपरी-चिंचवड परिसरातून हजारो आंबेडकरी अनुयायी सहभागी होतील असा विश्वास रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी यावेळी व्यक्त केला.
More Stories
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिक मध्ये संविधानदिन साजरा करण्यात आला
निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना करता येणार त्याच केंद्रांवर मतदान; पोलिसांसाठी असणार पोस्टल वोटिंग सेंटर
येवला येथील मुक्तीभुमीवर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरू