आपण झोपेतून जागे झालो, वाचले, लिहिले, बोललो, चर्चा केली तर!
आपल्याला आपले हक्क, अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदारीची जाणीव होईल!
अन्यथा भ्रष्ट दलाल वर्षानुवर्षं मलिदा खात बसतील!
■ कोणाला मिळते सवलत? आणि किती मिळते सवलत?
● कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या अटेंडंटसाठी रेल्वेच्या तिकीट दरांत सूट देण्याची तरतूद आहे. ते कुठेही उपचारासाठी जात असतील तर त्यांना AC चेअर कारमध्ये 75 टक्के सूट मिळते. तसेच, AC-3 आणि स्लीपरमध्ये 100 टक्के सूट उपलब्ध आहे. तसेच, फर्स्ट क्लास, सेकंड एसी क्लासमध्ये 50 टक्के सूट उपलब्ध आहे.
● थॅलेसेमिया, हृदयरोगी, किडनी रुग्णांनाही रेल्वेच्या तिकीट दरांत सवलत देण्यात येते. हृदयरोग असणारे रुग्ण, हृदय शस्त्रक्रियेसाठी जाणारे, मूत्रपिंडाचे रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपण किंवा डायलिसिससाठी गेल्यास रेल्वेच्या तिकीट दरांत सूट देण्याची तरतूद आहे. या स्थितीत AC-3, AC चेअर कार, स्लीपर, सेकंड क्लास, फर्स्ट एसीमध्ये 75 टक्के सूट उपलब्ध आहे. यासोबतच रुग्णांसोबत येणाऱ्या व्यक्तीलाही सूट मिळते.
● यासोबतच हिमोफिलियाच्या रुग्णांना उपचारासाठी जातानाही रेल्वेच्या तिकीट दरांत सवलत मिळते. या रुग्णांसोबत जाणाऱ्या एका व्यक्तीलाही रेल्वेच्या तिकीट दरांत सूट मिळते. या लोकांना सेकंड क्लास, स्लीपर, फर्स्ट क्लास, AC-3, AC चेअर कारमध्ये 75 टक्के सूट मिळते.
● टीबी रुग्णांना उपचारासाठी जाण्यासाठी रेल्वेच्या तिकीट दरांत सूट देण्याची तरतूद आहे. या रुग्णांना सेकंड, स्लीपर आणि फर्स्ट क्लासच्या तिकीट दरांमध्ये 75 टक्के सूट मिळते. तसेच, रुग्णासोबत जाणाऱ्या व्यक्तीला देखील रेल्वेच्या तिकीट दरांत सूट दिली जाते.
● संसर्ग नसलेल्या कुष्ठरुग्णांनाही सेकंड, स्लीपर आणि फर्स्ट क्लासमध्ये 75 टक्के सवलत दिली जाते.
● एड्सच्या रुग्णांना उपचारासाठी जाताना सेकंड क्लासच्या तिकीट दरांत 50 टक्के सवलत दिली जाते.
● ऑस्टॉमीच्या रूग्णांना प्रथम आणि सेकंड क्लासमधील मंथली सेशन आणि क्वाटर सेशनच्या तिकिटांमध्येही सवलत मिळते.
● तसेच, अॅनिमियाच्या रुग्णांना स्लीपर, एसी चेअर कार, एसी-3 टायर आणि एसी-2 टायरमध्ये 50 टक्के सूट दिली जाते.
मित्रांनो सोशल मीडियाचा सकारत्मक वापर करूयात,
महत्वाची योग्य ती माहिती पूर्ण वाचत जा,
वॉट्सअप्प, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिन्कडइंड, आशा वेगवेगळ्या सोशल मीडियावरून करून व्हायरल करा, पुढे पाठवा, शेअर करा,
सावध रहा! सतर्क रहा! जागरूक व्हा!
More Stories
Buddhist Circuit : बौद्ध सर्किट भेटींना चालना देण्यासाठी आंध्र प्रदेशने व्हिएतनामशी करार केला
भगवान.बुद्ध एक भौतिकशास्त्रज्ञ – अनिल वैद्य, माजी न्यायाधीश
Nashik : दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने वर्षावास ते पन्ना व दिवस कार्यक्रम संपन्न