April 2, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त ५५ हजार चौरस फुटाची भव्य रांगोळी काढून महामानवास अनोखे अभिवादन..!

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती परभणी शहरात अत मोठ्या थाटामाटात व हर्षोल्लासत उल्हासात साजरी होत आहे. भीम जयंतीच्या पूर्व संध्येला म्हणजेच आज दिनांक १३ एप्रिल २०२३ गुरूवार रोजी सायं ५:३० वा. स्व.इंदिरा गांधी स्टेडीयम मैदानावर तब्बल ५५ हजार चौरस फुटाची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रांगोळी साकारण्याचा विक्रम केला आहे. उद्धाटन प्रसंगी बोलताना मी सांगितेले की माझा सातत्याने हाच प्रयत्न असतो की डॉ.बाबासाहेबांना त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वासारखेच अभिवादन केले पाहिजे. म्हणूनच परभणीत पहिल्यांदाच आपण भव्य आणि विक्रमी रांगोळीच्या रूपात डॉ.बाबासाहेबांची प्रतिमा साकारून अनोखे अभिवादन करत आहोत. माझ्या विनंतीवरून या कार्यक्रमास आदरणीय भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, खासदार संजय जाधव साहेब, जिल्हाधिकारी आंचल गोयल मॅडम, पोलिस अधिक्षक रागसुधा मॅडम, डॉ.सिद्धार्थ भालेराव , काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस मिलिंद सावंत यांच्या सह धम्म पदयात्रा कोर कमिटीचे सर्व सदस्य, आयोजन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य व रांगोळी कलाकारांसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांचा उपक्रम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 साव्या जयंतीनिमित्त अनोखे अभिवादन.

120 क्विंटल रांगोळी,7 दिवस 16 कलाकारांची अथक मेहनत आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची तब्बल ५५ हजार चौरस फुटाची भव्य रांगोळीतील प्रतिकृती..