भारताच्या इतिहासातील प्राचीन वारसा लाभलेला आणि बौद्ध धर्माच्या व्यापारी इतिहासाचा सुवर्णकाळ आज साक्ष देत उभा आहे. इतिहासाचा मागोवा घेताना आज आपल्याला हा समृद्ध वारसा जाणून घेणे आवश्यक आहे.
सातवाहन वंशाचा इतिहास अभ्यासात्मक पद्धतीने समजून घेण्याची आज गरज आहे. हा इतिहास जोवर आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपल्याला आपली ओळख समजणार नाही.
अशा समृद्ध इतिहासाचे ज्ञानार्जन करण्यासाठी ट्रेकिंगच्या माध्यमातून आपल्या शरीराची जपणूक करू या.
बुद्धमय भारताचा इतिहास जगापुढे नेण्यासाठी समता सैनिक दलाच्या लेणी संवर्धक युनिटच्या सैनिकांसाठी खास एक दिवसीय ट्रेकिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या युनिट सोबत आपणही येऊन हा एक दिवसाचा ट्रेकिंगचा अनुभव निश्चित घ्यावा.
रविवार दिनांक २ जुलै २०२३ रोजी प्राचीन व्यापारी राजमार्ग नाणेघाट या ठिकाणी सकाळी ट्रेकिंग साठी व लेणी वर लेणी अध्ययन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभागी व्हावे.
नाणेघाट बुद्ध लेणीवर ट्रेकिंगचा आनंदही घेता येईल आणि धम्माचे संवर्धनही करता येईल
चला तर या ट्रेकिंग मध्ये सामील होण्यासाठी खालील अटीं समजून घेऊया ⬇
१) या ट्रेकिंगसाठी येणार असाल तरच आणि तरच समुह जॉईन करावा.
२) समुह हा ट्रेकिंगसाठी जाण्याच्या माहितीसाठी आहे त्यानुसार समुहात चर्चा करणे.
३) समुहात कॉपी/पेस्ट कमेंट करू नये.
४) समुहात आल्यावर प्रथम लिस्ट अपडेट करणे व दिलेला फॉर्म भरणे बंधनकारक असेल.
५) मुंबईहून ट्रेकिंगसाठी सेपरेट गाडी केली जाते, इतर ठिकाणाहून येणाऱ्या सदस्यांना डायरेक्ट लोकेशन दिले जाते.
६) समुहात नियोजनाचे अपडेट घेत राहणे.
७) ही ट्रेक म्हणजे केवळ ट्रेकिंग नसून ध्यास आहे धम्माचा वारसा जतन करण्याचा.
८) समुहात जॉईन झाल्यावर नाव अपडेट केल्यावर येणे बंधनकारक आहे.
९) नाव अपडेट करून न आलेल्या सदस्यांना पुढच्या वेळेस बॅन केले जाते.
१०) समुहात सामील झाल्यावर येणे बंधनाकारक असेल.
११) समुहात जॉईन झाल्यावर दिलेला फॉर्म भरणे बंधनकारक आहे.
१२) या ट्रेकसाठी प्रवासखर्च जो असेल, तो देणे बंधनकारक असेल.
समुहाची लिंक : https://chat.whatsapp.com/DYcPGBJbuob4lOHFF4RD58
🙏🏻🌹 धन्यवाद 🌹🔱
समता सैनिक दल ,लेणी संवर्धक युनिट
२ जुलै २०२३ रोजी समता सैनिक दल लेणी संवर्धक युनिट ट्रेकिंग कॅम्प प्राचीन व्यापारी राजमार्ग – नाणेघाट

More Stories
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा
🌟 “थ्रिव्ह” सह आपली क्षमता अनलॉक करा – 21-दिवसीय ध्यान प्रवास! 🌟
सामाजिक क्रांती अभियान Social Revolution Campaign – चलो चवदार तळे ते भीमा कोरेगाव भव्यधम्म पदयात्रा