भगवान बुद्ध वैशाली नगर येथे मुक्कामी असताना बुद्ध धम्म प्रचार करण्याकामी बुद्धांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यन्त पोहचावे म्हणून बुद्धांचा प्रचंड शिष्यवर्ग नगरामध्ये आजू बाजूंच्या गावात खेड्यातील जनतेस बुद्ध आल्याची बातमी सांगत फिरत होते.
एक नवीन शिष्य असाच नगरात धम्म प्रचार करत असताना सायंकाळी एका ठिकाणी भुकेने व्याकुळ एक भिकाऱ्याने शिष्याकडे भिक मागण्यासाठी हात पुढे पसरला शिष्य भिकार्याला म्हणाला अरे असा काय भिक मागतो तुला माहीत नाही का वैशाली नगर मध्ये माझे गुरु भगवान बुद्ध आले आहे चल ते काही तरी आयुष्य जगण्याचा मार्ग सांगतील त्यांचा उपदेश ऐकला तर तुझ्या मनाला शांती लाभेल पण भिकाऱ्याच्या अंगात खूप अशक्त झाला होता त्याच्या कडे बुद्धांपर्यंत चालण्याची सुद्धा शक्ती नव्हती तो म्हणाला मी नाही येऊ शकणार तुझ्या गुरु कडे.
शिष्य भिकार्या पासून पुढे निघून गेला थोड्याच वेळात बुद्धांच्या जवळ जाऊन भिकार्या सोबत घडलेला प्रसंग कथन केला सर्व प्रसंग बुद्धांनी शांत चित्ताने ऐकला आणि सोबत थोडे अन्न घेतले आणि शिष्यास बुद्ध म्हणाले चल माझ्या सोबत कुठे आहे ती व्यक्ती दाखव मला थोड्याच वेळात बुद्ध आणि शिष्य भिकारी असलेल्या जागी पोहचले त्यास खाण्यास पुरेसे अन्न दिले पोटभर खालल्या नंतर भिकारी झोपी गेला.
शिष्याने बुद्धांस विचारले भगवन तुम्ही त्याला काहीच उपदेश केला नाही फक्त अन्न दिले तथागत शिष्यास हसून म्हणाले त्याला पोटभरून जेवण देणे हाच त्याच्यासाठी उपदेश होता भुकेने व्याकुळ झालेला मनुष्य धम्म अधम्म काय समजणार त्याला दिलेले अन्न त्याला लाभलेले समाधान त्याला लागलेली सुखाची समाधानाची झोप हाच धम्म आहे.
सारांश – प्रत्येक परिस्थितीत तुमचा उपदेशच कामी येईल असे नाही वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे उपाय हेच त्याप्रसंगा वरील समाधान आहे आणि हाच मानवतेचा मानवतावादी बुद्ध धम्म आहे.
भवतु सब्ब मंगलम
More Stories
प्रव्राज्य Pravjaya
CULTIVATE THE WORLD-TRANSCENDING TEACHINGS जग-अतिरिक्त शिकवणी जोपासा
गौतम बुद्धांचे मौल्यवान विचार चिंता, द्वेष आणि मत्सर दूर करतात.