July 24, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ४४ वी रैंक नाशिकचे नाव देशात झळकवले प्रेस कामगाराचा मुलगा झाला ‘आयइएस’ अधिकारी

प्रेस कामगाराच्या मुलाने लोकसेवा आयोगाच्या आयइएस परीक्षेत देशात ४४ वी रैंक मिळवत भारतीय अभियांत्रिकी सेवेत उज्ज्वल यश संपादन केले. गौरव शैलेंद्र डोळस याने पाचव्या प्रयत्नात यश मिळवत नाशिकचे नाव देशात झळकवले. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इंडिया सिक्युरिटी प्रेस कामगाराचा मुलगा गौरव डोळस याचे शिक्षण प्राथमिक शिक्षण साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्यामकांत शिवरामेविद्यालयातझाले. माध्यमिक शिक्षण याच संस्थेच्या के. जे. मेहता हायस्कूल येथे पूर्ण केले, पुढे त्याने ग्रामनगाव शासकीय अभियांत्रिकी

गौरव डोळस याचे अभिनंदन करताना समता शिक्षक परिषदेचे पदाधिकारी.

महाविद्यालयात पदविका घेत पुढील शिक्षण भुजबळ नॉलेज सिटी येथे पदवीचे शिक्षण घेतले. पदवीनंतर त्याने २०१७ मध्ये भारतीय लोकसेवा आयोगाच्या आयइएस परीक्षा देण्याची तयारी सरू केली पाच वेल्ला लगाने

परीक्षा दिली, मात्र यश थोड्या गुणांनी हुलकावणी देत होते. तरीदेखील निराश न होता त्याने स्पर्धा परीक्षा देणे सुरूच ठेवले. दिल्ली दिल्ली येथे तयारी केली आणि पाचव्या प्रयत्नामध्ये त्याने यशाला गत्त्रयाणी प्रभातली त्याच्या यशाचे

श्रेय त्याने वडील शैलेंद्र आणि छाया डोळस यांना दिले. आई-वडिलांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत अपयशाने खचून न जाता यश नक्की मिळेल याचे मार्गदर्शन केल्याने पाचव्या प्रयत्नामध्ये यश संपातित करत

भारतीय इंजिनिअरिंग सेवेत महत्त्वाचे पद : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या भारतीय इंजिनिअरींग सेवेत आयइएस महत्त्वाचे पद आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार विभागात थेट अभियंता पदावर काम करण्याची संधी मिळते. दोन टप्प्यात परीक्षा घेतली जाते. कमी पदे असल्याने ही परीक्षा देशात सर्वात कठीण मानली जाते. परीक्षा पास करणाऱ्या उमेदवाराला देशात इलेक्ट्रॉनिक अँण्ड टेलिकम्युनिकेशन विभागात उच्चस्तरीय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळते.

आपल्या आई-वडिलांचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. समता शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, शंकर कांबळे, केंद्रीय विद्यालयाचे शंकर सोनुले यांनी गौरवचे अभिनंदन केले, गौरव शैलेंद्र डोळस यांचा नाशिक जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी समाज्याच्या वतीने गुणगौरव सोहळा नियोजित करण्यात येणार आहे