नाशिक : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समिती नाशिक यांच्या वतीने सालाबाजाप्रमाणे याही वर्षी शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बाबासाहेबांच्या जीवनातील घटनेवर आधारित देखावा साकारण्यात येणार आहे.
हा देखावा लंडन येथील बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या बंगल्याचा असून अतिशय सुंदर देखावा आहे. याचं चित्र सागर शिरसाठ यांनी तयार केलेला देखावा मुंबईहून आलेले सुनील समजस्कर हे करणार आहेत. यासाठी सर्व तांत्रिक यंत्रणा अमर वझरे अमर तांबे आणि जितेंद्र निर्भवणे हे करणार आहेत याप्रसंगी या देखाव्याचे भूमिपूजन झाले तसेच भन्ते संग्रता यांनी बुद्ध वंदना घेतली या कार्यक्रमासाठी नाशिक महानगर परिसरातील जयंती उत्सव समिती यांचे सर्व अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष अक्षय साळवे, उपाध्यक्ष नीरज तेजळे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
नाशिक मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लंडनच्या घराचा देखाव्याची संकल्पना माननीय आनंद भाऊ सोनवणे यांची असून त्यांचे सर्व सहकारी दिलीप साळवे, अर्जुन नाना पगारे, बाळासाहेब शिंदे, दीपचंद दोंदे, संजय खैरनार, नितीन चंद्र मोरे, संतोष सोनपसारे, उमेश गायकवाड, लाला अहिरे, प्रकाश लाला अहिरे, संजय साबळे, कविता तेजाळे, कविता पवार, उमेश गायकवाड, गौतम भालेराव, किशोर घाटे, दामोदर पगारे, प्रकाश पगारे, विकी चाबुकस्वार, रंजन भाऊ ठाकरे, आकाश भालेराव, पवन पवार, संजय भालेराव, भारत निकम, शरद काळे विजय अहिरे, बाळासाहेब डांगळे, किशोर महाले, रवी जाधव, दीपक डोके, देवानंद काळे, बाबा चव्हाण, कच्चेभान आव्हाड, नितीन सोनवणे, लाला आहिरे आदी उपस्थित होते.
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?