January 13, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा !

नाशिक : नाशिक जिल्हा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या हस्ते आज नाशिकरोड याठिकाणी संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान दिन साजरा करण्यात आला.

नाशिक जिल्हा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संविधान दिन साजरा ! यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अनेक महापुरुषांच्या घोषणा देऊन संविधानाच्या प्रतीला पुष्पहार अर्पण करून यावेळी गणेशभाई उन्हवणे म्हटले की संविधान हे देशाचा सर्वोच्च पुस्तक आहे त्यामुळेच देशातील अनेक जात धर्म भाषा पंथ व वेगवेगळ्या चालीरीती असलेल्या अनेक लोकांसाठी कायदा बनवून सर्वांना देशातील सर्वोच्च कायद्याच्या एका जूडग्यात बांधून या देशातील कायदा व व्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम व माणुसकीला जगवण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून भारत देशावर कुठलेही किंमत न घेता त्यांनी आपल्यावर आणि देशावर संविधान लिहून एक प्रकारे उपकारच केले आहे त्या उपकाराची परतफेड म्हणून भारतातील सर्व लोकांनी संविधानाला जतन करण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे ही जबाबदारी आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाची आहे म्हणून संविधान टिकले तर देश टिकेल आणि या देशातून संपूर्ण लोक आणि जगामध्ये

आजच्या दिवशी संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होऊन अभिवादन करत आहेत यावेळी जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे जावेद शेख,नवनाथ कातकडे,बिलाल,शेख आबिद शेख,रफिक टकारी,मनोज अहिरे,गोविंद शिंगारे,देविदास पवार,मुरलीधर कोळे,शरद सोनावणे,सुनिता कर्डक,अलका निकम,ज्योती अहिरे,अनिता कर्डक,विमल सोनवणे आदी महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.