Nashik : राज्यासह देशात प्रदूषणाच्या बाबतीत नागपूर, चंद्रपूर ही शहरे क्रमवारीत अग्रस्थानी आहेत. अशात महानिर्मिती कंपनीच्या जुन्या बंद होणाऱ्या एक हजार २५० मेगावॉट क्षमतेच्या संचाच्या बदल्यात हा एक हजार ३२० मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. (Injustice against to Nashik Thermal Power Station news)
विदर्भात प्रदूषण व आरोग्याच्या तक्रारीच्या कारणांवरून नवीन औष्णिक वीज संचांना विरोध होत असताना नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील कोराडी येथे दोन बाय ६६० वॉट क्षमतेच्या कोळशावर आधारित सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता देण्याचा निर्णय गुरुवारी (ता. १९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते.
आजवर प्रकल्प बचाव संघर्ष समितीने प्रकल्पासाठी खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, माजी आमदार योगेश घोलप व सध्याच्या आमदार सरोज अहिरे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले; परंतु नाशिकला संच आणण्यात अपयश आले, असेच म्हणावे लागेल.
राज्याची भविष्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन मुंबईला लगतचे पडणारे केंद्र व वीज गळती कमी हा मोठा फायदा असतानाही वीज महाग पडते, असे कारण देत नाशिकला डावलण्यात आले आहे. राज्यात वेगाने होणारे औद्योगिकरण तसेच प्रकल्पासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध असताना नाशिकची वीज महाग पडते, हे कारण पुढे करीत आहेत. जे संच मागतात, त्यांना देत नाहीत व जिथे विरोध होतोय, तिथे संच उभारण्यास मान्यता दिली जात आहे.
क्षमतेपेक्षा जास्त औष्णिक विज प्रकल्प विदर्भात असल्याने तेथील पर्यावरण वादी संघटनांचा विरोध असतांना सुद्धा नवीन प्रकल्प तिकडेच मंजूर करतात.नाशिकच्या लोकांची तीव्र मागणी असतांना सुद्धा तोंडाला पाने पुसण्याचे काम हे सरकार करत आहे .
सागर दिलीप जाधव
( उपाध्यक्ष:-नाशिक औष्णिक वीज प्रकल्प बचाव संघर्ष समिती )
More Stories
HSRP नंबर प्लेट बसवली नाही, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अपॉईंटमेंट घ्यावी
श्रीलंकेतील बौद्ध मंदिराच्या परिसरात अशोक स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली
‘बौद्ध धर्मासाठी बुद्ध आवश्यक आहे का ?’: DOGE मधून बाहेर पडताना एलोन मस्क