January 16, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

Nashik : धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व सम्राट अशोक विजयादशमी दिनी गायक संदेश उमप व गायक प्रवीण डोणे यांचा प्रबोदनाचा कार्यक्रम

 सर्व बौद्ध बांधवाना धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व सम्राट अशोक विजयादशमी च्या मंगलमय शुभेच्या.

13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी मुक्त्तीभूमी येवला नाशिक येथे धर्मांतराची घोषणा केली कि मी हिंदु म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मारणार नाही . कि ज्या धर्मा मद्धे माणूस म्हणून माणसाला जगण्याचा अधिकार नव्हता , पाणी पिण्याचा अधिकार नव्हता,मंदिर प्रवेशाचा अधिकार नव्हता ,वर्गात बसून शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी धर्मांतराची घोषणा केली आणी 14 ऑक्टोबर 1956 ला सम्राट अशोक विजयादशमी च्या दिवशी हिंदू धर्माचा त्याग करून बौध्द धर्माचा स्वीकार केला .म्हणून हा दिवस सर्व बौध्द बांधवानी दिवाळी सारखा साजरा केला पाहिजे कारन याच दिवशी बौद्धांच्या प्रगतीची सर्व दारे खुली झाली .

म्हणून भरतीय बौध्द महासभा ,समता सैनिक दल व बी.एम.ए . ग्रुप यांच्या सयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी दु. 12 ते सायं .6 वाजे पर्यंत बुद्धलेणी येथे गायक संदेश उमप व गायक प्रवीण डोणे यांचा प्रबोदनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . तरी सर्व बौध्द बांधवानी पांढरे कपडे घालून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे आपला मोहन अढांगळे संस्थापक आध्य्क्ष बी,एम.ए .गृप थांबतो नमो बुध्दाय जय भीम .