श्री. पद्मतारा सामाजिक शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था आणि महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियानतर्फे कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न!
श्री पद्मतारा सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशिय संस्था, नाशिक व महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान नाशिक
यांच्या संयुक्त विद्यमाने कवीवर्य किरण लोखंडे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित कवि संमेलन व काव्यलेखन स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवार दि.२२ सप्टेंबर २०२४ रोजी, सीटी आर्केड हॉल, जेलरोड येथे, उत्साहवर्धक वाताव रणात संपन्न झाला.
कविसंमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी विष्णू नारायण भटकर, महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियानचे अध्यक्ष सुरेशचंद्र आहेर,सरचिटणीस अशोक भालेराव,समाजभूषण /संयोजक
कैलास तेलोरे,कवी किरण लोखंडे, श्री पद्मतारा सामाजिक शैक्षणिक बहु उद्देशिय संस्था नाशिकचे अध्यक्ष
अविनाश वाघ(सर) यांनी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले,डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे तसेच साहित्यिक किरण लोखंडे व त्यांच्या पत्नी सरला लोखंडे यांचा सपत्नीक शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.दलित विकास महासंघातर्फे किरण लोखंडे यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून मानपत्र देण्यात आले.मानपत्राचे वाचन कुमारी श्रध्दा मालुंजकर हिने केले.
जेष्ठ कवी विनायक (जयराज) उनवणे,रविकांत शार्दुल,प्रा.निशांत गुरू,बाळासाहेब गिरी,शिवराज सिरसाठ,सुभाष उमरकर,रमेशचौधरी, रविंद्र चिंतावार, रामचंद्र शिंदे,दत्तात्रय दाणी,मगनलाल बागमार,गोरखपालवे
राजेंद्र सोनवणे,सुदाम सातभाई, ज्ञानेश्वर भामरे,वैजयंती सिन्नरकर, कविता कासार,रेखा सोनवणे,अख्तर पठाण, सीमाराणी बागुल, कु.ऋग्वेदा घोलप,कु.चंचल जाधव,शारदा तपासे रचना चिंतावार,सपना बेंडकुळे,संजय आहेर,शा.भाऊराव साळवे,योगेश जाधव,विलास गोडसे आदी कवी कवयित्रींनी एका पेक्षा एक दर्जेदार काव्यरचना सादर करून काव्य संमेलनास रंग आणला.
सर्व कवी कवयित्रींचा गुलाबपुष्प व प्रशस्तीपत्र पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
त्यानंतर महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियानतफे घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पार पडला. यात विजेते कवी प्रथम क्र… दत्तात्रय दाणी, व्दितीय..विशाल टर्ले,* तृतीय क्र…सीमाराणी बागुल. यांचा रोख रक्कम,प्रशस्तीपत्र,पुष्प व स्मृतीचिन्ह प्रदान करून गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी अशोक भालेराव यांनी,सुत्रसंचालन कवी रविंद्र मालुंजकर यांनी,स्वागत अनिल मनोहर यांनी तर आभार रत्नदीप जाधव यांनी मानले.काव्यसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष संपत खैरे, जिल्हा सचिव मनोहर नेटावणे,जिल्हा संघटक रविंद्र बराथे,श्रीकांत श्रावण, राजेंद्र वावधाने,भारती गांगुर्डे,शैलेश हांडोरे,मंगेश बनसोडे, रविंद्र निकाळे, प्रमेशू लोखंडे,मयंक लोखंडे,रूपेश जाधव आदींनी अथक परिश्रम घेतले.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
More Stories
भारत देशामध्ये प्रथमच भिकूंच्या अस्थि जतन करण्याचा निर्णय घेतला – बुद्धिस्ट भारत टीम
भगवान बुद्धांच्या धम्माच्या प्रचारासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. – भन्ते बूनली
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांवर खुनाचा गुन्हा दाखल करा : राहुल डंबाळे