नाशिक : परभणीत झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईपर्यंत लाँग मार्च काढलेल्या आंदोलकांशी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर व आष्टीचे आ. सुरेश धस यांनी शनिवारी नाशिक येथे चर्चा करून मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
पोलिस कोठडीत मृत्युमुखी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी, तसेच संतोष देशमुख व विजय वाकोडे यांना न्याय मिळावा, यासाठी गेल्या महिन्यापासून परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता. शुक्रवारी (दि. ७) माडसांगवी गावापासून नाशिक शहरात लॉन्ग मार्च येताना नांदूर नाका मिरची चौफुली तसेच औरंगाबाद नाका पासून पुढे जाताना द्वारका येथे लॉंग मार्च वतीने रास्ता रोको करण्यात आला होता तसेच सी बी एस मुंबई नाका येथेही लाँग मार्चच्या वतीने मोठ्या येथे रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर विल्होळी येथील बुद्ध स्मारकात थांबले होते. तेथून पुढे जाण्याआधीच आ. बोर्डीकर आणि धस यांनी त्यांची भेट घेत चर्चा केली. दरम्यान, पालकमंत्री व आमदारांनी पाठपुरावा केल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले असले,
तरी महिनाभरात याबाबत कार्यवाही न झाल्यास नाशिक येथून पुन्हा हा मोर्चा मुंबईकडे काढण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.
सुमारे पंधरा मागण्या मोर्चेकऱ्यांनी शासनापुढे ठेवल्या होत्या. या सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र आ. बोर्डीकर व आ. धस, परभणीचे पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे यांनी मोर्चेकऱ्यांना दिले. यानंतर मोर्चेकऱ्यांनी आंदोलन नाशिक येथे स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. याप्रसंगी आशिष वाकोडे, भीमराव हंबेरे, रवी सोनकांबळे, सिद्धार्थ भालेराव, प्रकाश कांबळे, अर्जुन पगारे, सागर वाघ, दामोदर पगारे, आकाश भालेराव, दीपक डोके, प्रशांत खरात, गणेश उनवणे, नंदन पाईकराव, सागर वाघ , विशाल पाडमुख, नितीन पिंपळीसकर, अंकित दोंदे, राहुल जाधव, बाळासाहेब साळवे, आबासाहेब डोके,यांसह नाशिकमधील पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आश्वासन मागण्या मान्य परभणी ते मुंबई लाँग मार्च स्थगित

More Stories
धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Dhamma Propagation Service Cooperation Collaboration Appeal
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.
पांगी फोरमने पंतप्रधान जन विकास कार्यक्रमांतर्गत बौद्ध गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.