ऐतिहासिक बोधीवृक्ष रोपण महोत्सवाचा प्रचार प्रसार करिता धम्म दौरा धम्मसेवक अर्जुन नाना पगारे १० दिवसा पासून सुरु केला आहे, धम्म दौरा करून सर्वांनी ऐतिहासिक बोधिवृक्ष रोपण सोहळ्यात जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान करत आहेत.
नाशिक प्रतिनिधी : २४ ऑक्टोबर २०२३ रोजी नाशिक शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे महाबोधी वृक्षारोपण समारंभ सोहळा सम्पन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात आपण समाजातील घटक असून नाशिक शहरात महाबोधी वृक्षारोपण होणार ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे सर्व समाजबांधवांनी बोधिवृक्ष रोपण सोहळ्यात सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे याकरिता धम्मदौरा करून कार्यक्रमाची माहिती महाराष्ट्रातील तमाम आंबेडकर बांधवाना पोहचवण्याचे काम धम्मसेवक, समाजरक्षक आयु. अर्जुन नाना पगारे करत आहेत आणि सर्वांनी ऐतिहासिक बोधिवृक्ष रोपण सोहळ्यात येण्याकरिता नियोजन करत आहेत
ऐतिहासिक बोधिवृक्ष रोपण सोहळ्यात नियोजन संदर्भात मीटिंग करून सर्वांना पोस्टर बॅनर वाटप करून कार्यक्रमाची रूपरेषा ,वेळ आणि सोहळ्यात आपली भूमिका कशी असावी आदर्श धम्म बांधवांनी कार्यक्रमात जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान धम्मसेवक , समाजरक्षक आयु.अर्जुन नाना पगारे यांच्या वतीने करण्यात येताना दिसून आले.
More Stories
महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ भंते विनाचार्य यांचा जनसंवाद, धम्म ध्वज यात्रा
धम्म ध्वज यात्रेचे दिनांक, सभा, मुक्काम, समारंभ आणि समापन संदर्भात महत्वाचे वेळापत्रक
आषाढ पौर्णिमा ( गुरुपौर्णिमा ) नागसेन बुद्ध विहार